घरताज्या घडामोडीपोषण आहाराचे 21 हजार क्विंटल धान्य वाटले

पोषण आहाराचे 21 हजार क्विंटल धान्य वाटले

Subscribe

जिल्ह्यातील 3901 शाळेतील चार लाख 39 हजार विद्यार्थ्यांना लाभ

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना अन्नधान्याचे वाटप होत असताना शाळेत शिल्लक असलेल्या पोषण आहाराचे तांदूळ व कडधान्याचे विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात चार लाख 39 हजार विद्यार्थ्यांना 21 हजार क्विंटल धान्याचे वाटप झाले आहे. यात पाच हजार 345 क्विंटल डाळी व कडधान्य तर, 15 हजार 561 क्विंटल तांदळाचा समावेश आहे.जिल्हा परिषदेच्या व खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन दिले जाते. यात पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारात तांदळाची खिचडी मिळते. दाळींमध्ये हरभरा, मटका, मूगदाळ व तूरदाळीचा समावेश होतो. शाळा बंद होण्यापूर्वी म्हणजेच 13 मार्चपूर्वी जिल्ह्यातील 40 टक्के शाळांना धान्य पुरवठा केला होता. त्यातील 91 टक्के पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप केल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने म्हटले आहे.

316 शाळांमध्ये वाटप प्रलंबित
जिल्ह्यातील साडेतीन हजार शाळांमध्ये पोषण आहाराचे वाटप होत असताना 316 शाळांमध्ये पुरेसा साठा नसल्याने वाटप प्रलंबित आहे. लॉकडाऊनमुळे कळवण तालुक्यातील वाटप बंद झाले असून, नांदगाव, येवला व देवळा या तीन तालुक्यांमध्ये शंभर टक्के वाटप झाले आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -