घरमहाराष्ट्रनाशिकशेतकर्‍यांच्या यादीसाठी प्रशासनाची धावपळ

शेतकर्‍यांच्या यादीसाठी प्रशासनाची धावपळ

Subscribe

जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी घेतला आढावा, शेतकर्‍यांची माहिती संकलित करण्याचे आदेश

शेतकर्‍यांसाठी केंद्राने शेतकरी जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंतच्या जमीनधारकांना वार्षिक सहा हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासंदर्भात जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत शेतकर्‍यांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले. तसेच या योजनेच्या निकषाबाबत अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले.

शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकरी कुटुंबाला सहा हजार रूपये देण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली. या योजनेची १ डिसेंबर २०१८ पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शेतकर्‍यांना पेन्शन त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी आता सर्व जिल्हाधिकार्‍यांना शेतकर्‍यांची माहिती लवकरात लवकर संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत महसुली अधिकार्‍यांना तत्काळ ५ एकरच्या आत शेती असणार्‍या शेतकरी कुटुंबांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अशा शेतकर्‍यांचेे बॅक खाते, आधार नंबर, आयएफसी कोड, सातबारा उतारा आणि कुटुंबातील व्यक्तींची संख्या, अशी सर्व माहिती गोळा करण्याच्या सूचना दिल्या. हे उत्पन्न प्रत्येकी दोन हजार रुपये, अशा तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले जाणार आहे. हे अर्थसहाय्य केंद्र सरकारद्वारे दिले जाणार असून त्याचा लहान आणि अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांना फायदा होणार आहे.

- Advertisement -

१ डिसेंबर २०१८ पासून लागू होईल आणि ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीसाठीचा पहिला हप्ता या वर्षातच देण्याचे नियोजन असल्याने त्या अनुषंगाने शेतकर्‍यांचा डाटाबेस तात्काळ तयार करावा लागणार आहे. पुढील पंधरवडयात तो गोळा करून एकत्रित सादर करावा. त्यात लाभार्थी कुटुंबांची संख्या, २ हेक्टरपर्यंत मर्यादेतील एकूण क्षेत्र, अशी आकडेवारी सादर करावी, असे आदेश दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -