घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा बँक करणार टॉप १५० थकबाकीदारांवर कडक कारवाई

जिल्हा बँक करणार टॉप १५० थकबाकीदारांवर कडक कारवाई

Subscribe

२९९० थकबाकीदारांकडे ४९ कोटी ६४ लाख ३८ हजारांची थकबाकी

कळवण : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई सुरु झाली आहे .जिल्हा स्थरावरील टॉप १०० थकबाकीदारांवर कारवाई सुरु झाल्यानंतर आता कळवण तालुक्यातील टॉप १५० थकबाकीदारांवर कारवाई होणार आहे.

तालुक्यात २९९० थकबाकीदारांकडे ४९ कोटी ६४ लाख ३८ हजारांची थकबाकी आहे. सदर थकबाकी वसुलीसाठी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कळवण यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी व सर्व विशेष वसुली अधिकारी यांनी युध्दपातळीवर काम सुरु केले आहे. जिल्हा बँकेच्या कळवण तालुक्यातील टॉप १५० थकबाकीदारांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याने त्यांची नावे लवकरच वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणार आहेत. आतापर्यंत १९३६ थकबाकीदार सभासदांचे कलम १०१ अन्वये सक्तीने वसुली करावयाचे दाखले सहकार विभागातून प्राप्त झाले आहेत. त्यातील ७३८ थकबाकीदारांची जमीन जप्त करून जप्ती बोजा लावण्याची कारवाई पूर्ण झाली आहे व उर्वरित थकबाकीदारांवर जमीन जप्तीची कार्यवाही चालु आहे.

- Advertisement -

११९ थकबाकीदार सभासदांची ऑपसेट प्राईज प्रस्ताव दाखल असून त्यापैकी ६१ ऑपसेट प्राईज प्रस्तावाला सहकार विभागाने मान्यता दिली आहे. ५५ थकबाकीदार सभासदांच्या जमिनीचे ३ लिलाव पूर्ण झाले आहेत. ४३ थकबाकीदारांच्या जमिनीवरील नावे कमी करून बँकेचे नाव लावणेबाबतचा कलम १०० नियम ८५ अन्वये प्रस्ताव सहकार खात्याकडे दाखल असून सुनावणी सुरू आहे.जिल्हा बँकेला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी कर्जवाटप चालू करणेसाठी व शाखेच्या ठेवी परत देणेसाठी बँकेला अशा प्रकारची कडक कारवाई करावी लागत असुन, थकबाकीदारांनी आपली थकबाकी देऊन बँकेला सहकार्य करावे असे आवाहन बँकेचे विभागीय अधिकारी जयवंत बोरसे यांनी केले आहे.

तालुक्यातील टॉप १५० थकबाकीदारांबर तातडीची वसुलीची कारवाई होणार आहे. पण त्यापूर्वी त्या १५० थकबाकीदारांना अंतिम सूचनापत्र देऊन थकबाकी भरण्याविषयी कळविण्यात आले आहे. त्यातून होणारी कारवाई टाळावी अन्यथा त्यांचे नाव वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात येईल. पुढील कारवाई बँक व सहकार खाते संयुक्तीकरित्या करतील.- जयवंत बोरसे,कळवण विभागीय अधिकारी, जिल्हा बँक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -