घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा काँग्रेसला बसणार झटका; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पुत्राचा पक्षप्रवेश

जिल्हा काँग्रेसला बसणार झटका; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पुत्राचा पक्षप्रवेश

Subscribe

निफाडचे ‘माणिक’ भाजपच्या वळचणीला ?

काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या आपल्या अभियानांतर्गत विविध राजकीय घराणी कवेत घेणार्‍या भाजपने आजवर निफाडच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या बोरस्ते घराण्याला आपलेसे करण्यात यश मिळवल्याची जारदार चर्चा आहे. सहकारमहर्षि माधवराव बोरस्ते यांचे सुपुत्र तथा निसाकाचे माजी चेअरमन माणिकराव बोरस्ते यांनी मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन प्रवेशाबाबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी केवळ पुत्र हेमंत याचा पक्षप्रवेश करून माणिकराव बोरस्ते यांनी योग्य तो राजकीय संदेश दिला आहे. दरम्यान, माणिकराव यांचा पक्षप्रवेश सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे.

निफाडच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार आदी क्षेत्रांत लौकिक राखून असलेल्या बोरस्ते परिवाराने नेहमीच बिनीची भूमिका निभावली आहे. माणिकराव यांचे वडील माधवराव यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केलेले कार्य संपूर्ण जिल्ह्याला ज्ञात आहे. निफाडच्या विविध क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदानही सर्वांना ठाऊक आहे. माधवराव यांच्या कार्याचा समृध्द वारसा पुत्र माणिकराव यशस्वीरित्या सांभाळत आहेत. निसाका, ओझर कॅनाल द्राक्ष बागायतदार संघ, मविप्र शिक्षण संस्था आदींच्या माध्यमातून माणिकराव यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. माणिकराव यांनी 1996 मध्ये निफाड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूकही लढवली होती. तथापि, त्यांना विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली. या पार्श्वभूमीवर बोरस्ते यांचा भाजप प्रवेश पक्षाला आणि पर्यायाने युतीला फलदायी ठरणार असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे. दरम्यान, बोरस्ते यांच्या मुंबई भेटीप्रसंगी ज्येष्ठ नेते शंकरराव वाघ, दिनकर कुयटे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

‘ते’ समीकरण डोळ्यासमोर ठेऊन प्रवेश?

दरम्यान, गेली तीन दशके काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या माणिकराव बोरस्ते यांचा भाजपमधील प्रस्तावित पक्षप्रवेश तालुकावासियांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे. निफाड मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाटेला असल्याने बोरस्ते यांना या निवडणुकीत नशीब अजमावण्याची संधी नाही. तथापि, उद्याच्या राजकीय घडामोडीत युती दुभंगल्यास माणिकराव भाजपचा चेहरा बनू शकतील. अर्थात, या जर-तरच्या गोष्टी असल्याने सध्या तरी बोरस्ते भाजपमध्ये आल्यास त्यांना युतीचा प्रचार करावा लागणार आहे.

राजेंद्र डोखळेही तयारीत?

दरम्यान, भाजप प्रवेशासाठी सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांच्या उड्या पडत असताना निफाडमधील आणखी एक नेते राजेंद्र डोखळे हेदेखील भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे असा राजकीय प्रवास करणार्‍या डोखळे यांची आणखी एक ‘इनिंग’ सुरू होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -