घरताज्या घडामोडीशिक्षिकेच्या संशयास्पद मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालयात गोंधळ

शिक्षिकेच्या संशयास्पद मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालयात गोंधळ

Subscribe

सातपूरमधील २६ वर्षीय एका शिक्षिकेचा रविवारी (दि.२) संशयास्पद मृत्यू झाला असून मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनास विरोध करत जिल्हा शासकीय रुग्णालयात गोंधळ घातला. तेजस्विनी राकेश भामरे (२६, रा.संभाजीनगर, सातपूर) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. मोठ्या संख्येने नातेवाईक रुग्णालयात आल्याने परिसरात ताणतणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सातपूर पोलिसांनी मध्यस्थी होत नातेवाईकांशी चर्चा केली. मात्र, ते शांत झाले नाही. शेवटी सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांनी नातेवाईकांशी संवाद साधत त्यांना शांत केले.

तेजस्विनी भामरे ही खासगी शाळेची शिक्षिका असून घरात इंग्लिश कोचिंग क्लासेस चालविते. रविवारी (दि.२) सकाळी तिचा संशयास्पद मृत्यू झाला. घरात इंग्लिश कोचिंग क्लासला आलेली मुले गेल्यानंतर ती मृतावस्थेत आढळून आली. ही बाब सातपूर पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला. दरम्यान, घटनास्थळी तिचे माहेरचे नातेवाईक नव्हते. सर्वजण दुपारी रुग्णालयात आले.

- Advertisement -

तिची आत्महत्या नसून सासरच्यांनी घातपात केल्यामुळेच तिचा मृत्यू झाला आहे, असा आरोप नातेवाईकांनी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई व्हावी, यासाठी जिल्हा रुग्णालयात रविवारी दुपारपासून गोंधळ घातला. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. तसेच, नातेवाईक मृतदेह ताब्यात नकार दिल्याने शवविच्छेदनास विलंब झाला.

तेजस्विनीच्या मृत्यूप्रकरणी पती राकेश भामरे आणि दीर प्रकाश भामरे यास ताब्यात घेतले आहे. नातेवाईक फिर्याद देताच पुढील कारवाई केली जाणार आहे. – राकेश हांडे, पोलीस निरीक्षक, सातपूर

एसपींनी दिलगिरी केली व्यक्त

मृत महिलेच्या नातेवाईकांना वाहतूककोंडीमुळे घटनास्थळी येण्यास उशीर झाला. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणला. ही बाब नातेवाईकांना समजताच त्यांनी पोलिसांवर आक्षेप घेतला. याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांनी मध्यस्थी करत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देत पोलिसांनी केलेल्या तांत्रिक चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -