घरउत्तर महाराष्ट्र25 हजारांना रेमडेसिवीर विकणारा डॉक्टर जाळ्यात

25 हजारांना रेमडेसिवीर विकणारा डॉक्टर जाळ्यात

Subscribe

कोरोना रुग्णांसाठी प्रभावी असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना मिळत नसताना दुसरीकडे खासगी डॉक्टरच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचे उघडकीस आले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन 25 हजारांना विकणाऱ्या खासगी डॉक्टरला पंचवटी पोलिसांनी रविवारी रात्री ताब्यात घेतले आहे. डॉ. रवींद्र मुळक असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. मुळक याने तीन रेमडेसिवीर इंजेक्शन असल्याचे तक्रारदारास सांगितले होते. एका रेमडेसिवीर इंजेक्शन किंमत 25 हजार असल्याचेही सांगितले. त्यानुसार तक्रादाराने खरेदीची तयारी दर्शविली. 5 हजार रुपये कमी पडत असल्याचे सांगत एटीएम सेंटरजवळ आले. तक्रारदाराने 100 क्रमांकावर कॉल केल्याने प्रकरण उघडकीस आले आहे. विषेश म्हणजे डॉ.मुळक याचे पंचवटीमधीलसद्गुरु रुग्णालयात कार्यरत असून, त्याचे म्हसरुळमध्ये स्त्री क्लिनिक आहे. पंचवटी पोलिसांनी तक्रादाराच्या मदतीने डॉ.मुळक यास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -