घरमहाराष्ट्रनाशिककुपनलिकेत पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला जीवदान

कुपनलिकेत पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला जीवदान

Subscribe
नाशिक गायकवाड सभागृहा समोरील हिरवे नगर मधील एक रिकामा भूखंड…वेळ दुपारची… भूखंडा शेजारी राहणार्‍या समीना शेख  यांना कुत्र्याचे पिल्लू किंचाळत असल्याचा आवाज येतो एक तास तसाच आवाज आल्याने त्या भूखंडा जवळ येतात, याठिकाणी त्यांना एक कुपनलिकेच्या पाईपमधून आवाज ऐकू येतो आजूबाजूला पिल्लाची आई आणि तिचे चार पिल्ले सैरावैरा पळत असतात घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक व तरूणांच्या मदतीने त्या पिल्लाला बाहेर काढून नवजीवन बहाल करतात.
इरफान अन्सारी, शैलेश अनगुंदे, आमीर शेख व नेचर कल्ब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा हे आपल्या परीने मदतकार्य सुरू करतात. शिंगाडा तलाव येथील अग्निशामक दलास माहिती दिली जाते. वीस मिनिटे उलटून देखील अग्निशामक दल पोहचत नाही. यामुळे हे नागरिकाच त्याला वाचविण्यासाठी प्रयोग करू लागतात मोठी दोरी आणि टोर्च आणला जातो पहिली दोरी आत सोडून खोलीचा अंदाज घेतलाजातो वीस फुट खोली असल्याचे लक्षात येताच आता त्याला वर कसे काढावे हा प्रश्न उपस्थित होतो. जवळ जाळी पडलेली असते दोराला ती जाळी लावून ती आत सोडली जाते. पण पाण्यात असलेला पिल्लू त्याच्यात अडकत नाही अनेक प्रयत्न केल्यावर तो पिल्लू त्या जाळीला पकडतो आणि जाळीत दात अडकून बसते मग स्थानिक नागरिक दोरी हळू हळू खेचून त्याला बाहेर काढतात. तो थंडीने गारठून गेल्याने त्याला कपड्याने झाकून त्याच्या आईकडे सुपूर्त केले जाते. आई लागलीच त्याला चाटू लागते व समीनाताई कडे  ती जावून जणू आभार व्यक्त करू लागते. त्या पिल्लाला समीना आणि अमीर शेख पशु वैद्यकीय दवाखान्यात घेवून येतात डॉ किरण आठरे व शिवाजी संत औषधोपचार करतात. व तो उद्या पर्यंत बरा होईल असे सांगताच सर्वांना बरे वाटते. शहरात अनेक ठिकाणी मोकळ्या जागेत कुपनलिका पाणी न लागल्याने तश्याच उघड्या आहेत. भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनपाने मोहीम राबवून बंद कराव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -