घरमहाराष्ट्रनाशिकवडगावपान सोसायटीवर शेतकरी ग्राम विकास मंडळाचे वर्चस्व

वडगावपान सोसायटीवर शेतकरी ग्राम विकास मंडळाचे वर्चस्व

Subscribe

१३ उमेदवार विजयी; कारखान्याचे चेअरमन प्रताप ओहोळ यांची माहिती

संगमनेर :  तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या वडगावपान विविध सहकारी सोसायटी निवडणुकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी ग्राम विकास मंडळांने सर्वच्या सर्व १३ जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रताप ओहोळ यांनी दिली.निवडणुकीत एक जागा बिनविरोध व १२ जागा मोठ्या फरकाने शेतकरी विकास मंडळाचे जिंकून आणल्या. याप्रसंगी महेश मोरे, डॉ. दादा थोरात, बाळासाहेब गायकवाड, अशोक थोरात, पंचायत समिती सदस्य बेबी थोरात, एन. टी. थोरात, अरुण गायकवाड, कुळधरण आदी उपस्थित होते.

या निवडणूकीत सर्वसाधारण मतदार संघातून अशोक बाबुराव काशिद, नानासाहेब शांताराम कुळधरण, आबासाहेब मनोहर थोरात, दिलीप माधव थोरात, निलेश गोरक्षनाथ थोरात, रामनाथ विष्णू थोरात, शंकर धोंडीबा थोरात, शंकर मारुती थोरात हे विजयी झाले असून इतर मागास प्रवर्गातून राधाकिसन मुरलीधर गडगे, महिला राखीव मतदार संघातून कमल रामनाथ काशिद, केशरबाई पोपट थोरात, भटक्या विमुक्त मतदार संघातून भिकाजी बाळाजी शिरसाठ तर अनु – जाती जमाती मतदार संघातून रविंद्र सिताराम गायकवाड हे मोठ्या मताधिक्यांनी निवडूण आले आहे.

- Advertisement -

याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन प्रताप ओहोळ म्हणाले की, हा विजय ऐतिहासिक आहे. सर्व सभासदांनी धनशक्तीला नाकारून गुणशक्तीवर विश्वास ठेवून मतदान केले. विरोधकांनी कायम खोटा प्रचार करून सभासदांना भुलवण्याचा प्रयत्न केला; परंतु सभासदांनी त्यावर विश्वास न ठेवता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विचारावर आचरण करणार्‍यावर व सर्व समाजासाठी गाव बांधिलकीचे काम करणारे उमेदवार निवडून दिले आहे.

जरी काहींनी अभाषी प्रचाराला धरून विरोधात मत टाकले असतील तर त्यांनी मंत्री थोरात व शेतकरी ग्रामविकास मंडळाच्या विचारावर व गावच्या परंपरेसाठी सलोखा राखून पुन्हा या विचारात सहभागी व्हावे. या सर्व विजयी उमेदवारांचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, बाजीराव खेमनर, रणजितसिंह देशमुख यांनी अभिनंदन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -