घरमहाराष्ट्रनाशिकप्रियंका घाटेंचा पत्ता कट करीत डॉ. ताजणेंना संधी

प्रियंका घाटेंचा पत्ता कट करीत डॉ. ताजणेंना संधी

Subscribe

महासभेनंतर महिला, बालकल्याण समितीत फेरबदल; महापौरांसमोर वैधानिक पेच

महिला आणि बालकल्याण समितीतून प्रियंका घाटे यांचे महासभेत जाहीर झालेले नाव सभेनंतर रद्द करीत त्या जागेवर डॉ. सीमा ताजणे यांना संधी देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे महासभेत जाहीर झालेली नियुक्ती अशी सभागृहाबाहेर रद्द करता येत नसतानाही ती करण्यात आल्याने महापौरांची आता वैधानिक कोंडी होणार आहे.

गेल्या मंगळवारी (ता. ९) झालेल्या महासभेत महापौर रंजना भानसी यांनी महिला व बालकल्याण, विधी, शहर सुधार आणि आरोग्य व वैद्यकीय सुधार समिती सदस्यांची घोषणा केली. प्रत्येक समितीत नऊ सदस्य भाजपचे आहेत. यात महिला व बालकल्याण समितीत नगरसेविका प्रियंका घाटे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. महासभेनंतर अचानकपणे चक्रे फिरली आणि घाटे यांच्या जागेवर नगरसेविका डॉ. सीमा ताजणे यांचे नाव निश्चित करण्यात आले.

- Advertisement -

मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ नुसार कोणत्याही विषय समित्यांच्या नियुक्त्या या महासभेत जाहीर व्हाव्यात आणि जर त्यात फेरबदल करायचा असल्यास तो महासभेतच करण्यात यावा. घाटे आणि डॉ. ताजणे यांच्या नावातील आदलाबदल महासभेनंतर झाल्याने आता वैधानिक पेच निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे डॉ. ताजणे यांना शहर सुधार समितीतही संधी देण्यात आली आहे. घाटे यांचे केवळ महिला व बालकल्याण समितीत नाव होते. तेही काढण्यात आल्याने स्थायी समितीत नियुक्ती व्हावी म्हणून घाटे यांचे नाव महिला व बालकल्याण समितीतून काढण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -