घरमहाराष्ट्रनाशिकसमाजकल्याण विभागात ७० हजारांची लाच घेताना वाहनचालकास अटक

समाजकल्याण विभागात ७० हजारांची लाच घेताना वाहनचालकास अटक

Subscribe

सहायक आयुक्त प्राची वाजेंच्या नावाने स्विकारली लाच

नाशिक : निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरण मंजूर करुन देण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त प्राची वाजेंच्या नावाने ७० हजार रुपयांची लाच स्विकारताना खासगी वाहनचालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.१०) सापळा रचून अटक केली. खासगी वाहनचालक गणेश बाबूराव घुगे (वय २७, रा.नाशिक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

लोकप्रतिनिधींसह शैक्षणिक कामकाजासाठी जात प्रमाणपत्राची नागरिकांसह विद्यार्थ्यांना गरज पडते. त्यासाठी अर्जदार मोठ्या आशेने समाज कल्याण विभागाकडे अर्ज करतात. मात्र, त्यांना वेळखाऊ प्रक्रियेमुळे मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच आता लाचप्रकरण उघडकीस आले आहे. तक्रारदाराचे निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरण मंजूर करुन देण्यासाठी गणेश घुगे यांनी सहायक आयुक्त प्राची वाजे यांच्या नावाने शनिवारी (दि.८) आगासखिंड (ता.सिन्नर) येथील तक्रारदाराकडे ७० हजार रुपयांची लाच मागितली होती.

- Advertisement -

याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पथकाने शहानिशा करुन सापळा रचला. तक्रारदाराकडून सोमवारी (दि.१०) ७० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने घुगे यांना अटक केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

प्रतिक्रिया

समाजकल्याण खाते हे गोरगरिबांच खाते आहे. अनेक मागासवर्गीय महामंडळांमध्ये गोरगरिब कर्ज घेत असतात. त्यांना असे त्रास देणे बरोबर नाही. जे त्रास देतील त्यांच्यावर कारवाई होईल. नाशिकमध्ये आज तो प्रकार समोर आला आहे. याप्रकरणची सखोल चौकशी करायला हवी. भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल.
– रामदास आठवले, केंद्रिय सामाजिक राज्यमंत्री

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -