घरक्राइमडोंगरावरून जेसीबी पडून चालकाचा मृत्यू

डोंगरावरून जेसीबी पडून चालकाचा मृत्यू

Subscribe

मनमाड : खडीक्रशरसाठी डोंगरावरून दगड काढताना जेसीबी खाली पडून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मनमाडपासून जवळ असलेल्या अनकवाडे येथे घडली.रोहित चव्हाण (वय 35) असे या चालकाचे नाव आहे अचानक घडलेल्या या घटनेमुळे अनकवाडे गावावर शोककळा पसरली

या बाबत अधिकवृत असे की मनमाड पासून 8 किमी अंतररावर अनकवाडे शिवारात खडीक्रॅशरसाठी डोंगरावरून दगड काढले जात असून रोहित चव्हाण हा जेसीबी घेऊन डोंगरावर गेला होता.दगड काढत असतांना एक दगड सरकला त्यामुळे रोहितचा जेसीबी वरून ताबा सुटला आणि जेसीबी थेट सुमारे 100 फुटावरून खाली कोसळला.घटनेची माहिती मिळताच इतर कामगार,मजुरांनी घटनास्थळी धाव घेऊन रोहितला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र इतक्या उंचावरून पडल्यामुळे रोहित च्या डोक्याला गंभीर मार लागला होता त्यामुळे त्याची जागीच प्राणज्योत मावळली होती. त्याच्या पश्चात पत्नी,आई,वडील,तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार असून अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अनकवाडे गावावर शोककळा पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -