घरमहाराष्ट्रनाशिकनाशिककरांनो पाणी संकट घोघावतंय, पाणी जपून वापरा!!

नाशिककरांनो पाणी संकट घोघावतंय, पाणी जपून वापरा!!

Subscribe

पावसानं पाठ फिरवल्यानंतर आता नाशिककरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. कारण ग्रामीण भागामध्ये यापूर्वीच टँकरनं पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

पावसानं पाठ फिरवल्यानंतर आता नाशिककरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. कारण ग्रामीण भागामध्ये यापूर्वीच टँकरनं पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये देखील घट झाली आहे. त्यामुळे पाण्याचं नियोजन करताना आता प्रशासनाचा देखील कस लागणार आहे. पावसाळ्याला अद्याप सहा महिन्यांचा अवधी आहे. पण, पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज घडीला धरणांमध्ये जून अखेर पूरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या नाशिकमधील जलाशयांमधील पाणीसाठा ५० टक्क्यांवर आला आहे. दरम्यान, मराठवाड्यासाठी नाशिकमधून ३.२४ टीएमसी पाणी सोडण्यात आलं आहे. नाशिकच्या धरणांमधील पाणीसाठा हा १५ जानेवारीनंतर ५० टक्क्यांवर जातो. पण, महिन्याभरापूर्वीच हा पाणीसाठा आता ५० टक्क्यांवर आला आहे. १०३ टँकरद्वारे जिल्ह्यातील काही भागांची तहान भागवली जात आहे. पुढील काळात ही संख्या ३०० वर पोहोचण्याची शक्यता आहे.

दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असताना ग्रामीण भागातून पाण्याची मागणी आता दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यांचे पिण्याच्या पाण्याचे रोटोशन हे ठरलेले असते. त्यानंतर देखील आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून वेळेआधी पाणी सोडा असा रेटा पुढाऱ्यांकडून लावला जात आहे. शिवाय, पुढाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये देखील शिष्टमंडळ जिल्हा प्रशासनाच्या भेटी घेऊन पाण्यासाठी दबाव टाकत आहेत.

- Advertisement -

शेती व्यवसाय संकटात

जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर, जिल्ह्यातील काही भागांमध्ये देखील आता दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पावसानं पाठ फिरवल्यानं शेतीच्या उत्पन्नांमध्ये देखील घट झाली आहे. त्यामुळे बळीराजा आता आत्महत्या करत आहे. आगामी काळात पाणी संकट आता वाढताना दिसत आहे. त्यामुळे शेतीवर देखील त्याचा परिणाम होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -