घरमहाराष्ट्रनाशिकतळीरामांवर गटारीची पडी

तळीरामांवर गटारीची पडी

Subscribe

पोलिसांकडून नाकबंदी करत हॉटेल, धाबे, मद्यपीचालकांची तपासणी

दारूच्या नशेत वाहन चालविणे कायदेशीर गुन्हा असल्याने अशा तळीरामांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस व वाहतूक शाखेतर्फे नाकाबंदी करण्यात आली. १५ हॉटेल, लॉजेस व धाब्यांची पोलिसांनी तपासणी करत २७ जणांवर कारवाई केली तर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह अंतर्गत १०१ जणांवर कारवाई करण्यात आली. गटारी अमावस्या सेलिब्रेट करणार्‍यासाठी तळीरामांनी बुधवारी (ता.३१) रात्री नातेवाईक व मित्रमंडळींसह बाहेर पडत मांसाहारासह मद्यसेवनाचा बेत आखला. हजारो किलो चिकन, मटण व मासळीवर खवय्यांनी ताव मारत गटारी अमावस्या साजरी केली. शहरातील विविध हॉटेल, धाबे, वाइन शॉप व बारमध्ये तळीरामांनी गर्दी केली होती.

आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी बुधवारी (ता.३१) रात्री १० ते १ वाजेच्या दरम्यान दीप अमावस्ये (गटारी) निमित्त तळीरामांसह खवय्यांनी हॉटेल, धाबे, यांमध्ये गर्दी केली. मद्यपीचालक, टवाळखोर, गुन्हेगारांकडून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करत तळीरामांविरोधात कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हची दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसांनी दुचाकी व चारचाकींवर नजर ठेवली. पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांची ब्रेथअ‍ॅनालायझरव्दारे तपासणी केली. रेकॉर्डवरील, दहशत पसरविणारे व मालमात्तेचे नुकसान करणार्‍या गुन्हेगारांची तपासणी करत कारवाई केली. कारवाई टाळण्यासाठी अनेकांनी मद्यसेवन न केलेल्यांना वाहनाचे चालक बनविले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -