घरताज्या घडामोडीबायको गेली माहेरी, टल्ली नवऱ्याची 'टॉवर'वारी

बायको गेली माहेरी, टल्ली नवऱ्याची ‘टॉवर’वारी

Subscribe

चार तासानंतर तरुणाची नशा उतरल्यावर तो खाली आला. तेव्हा सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान तरुणाला वर चढण्याचे कारण विचारले असता बायको माहेरी गेल्याने टॉवरवर चढलो असल्याचे तो म्हणाला.

मध्यधुंद अवस्थेमध्ये लोक काय काय करतील त्याचा काही नेम नाही. बायको माहेरी गेल्यावर काही तरुण घरीच जंगी पार्टी करतात. परंतु एका तरुणाने बायको माहेरी गेल्याच्या रागात थेट उंच टॉवर वारी केली आहे. नाशिकच्या निफाडमध्ये एक मद्यधुंद अवस्थेमध्ये दूरसंचारच्या तीनशे फूट उंचीच्या मनोऱ्यावर चढला होता. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा तरुण खाली उतरला. बायको माहेरी गेल्याच्या राग आल्याने आपण मनोऱ्यावर चढलो असल्याचे या तरुणाने खाली उतरल्यावर सांगितले.

नाशिकच्या निफाडमध्ये शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक तरुण भारत संचार निगम लिमिटच्या साडे तीनशे फूट उंच मनोऱ्यावर चढला होता. निफाड नाशिक रस्त्यावरील जळगाव फाटा येथे भारत संचार निगम लिमिटेडचा टॉवर आहे. या टॉवरच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील तरुण बायको माहेरी गेल्याच्या रागात थेट मनोऱ्यावर चढला होता. मनोऱ्यावर चढलेल्या तरुणाचे नाव दिलीप मोरे असे आहे. सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून तरुण मनोऱ्यावर भराभर चढला आणि सर्वात उंच पोहोचला.

- Advertisement -

मद्यधुंद तरुणाचा हा पराक्रम पाहून आजूबाजूचे नागरिक धास्तावून गेले आणि त्याला खाली उतरवण्यासाठी सर्वांची एकच तारांबळ उडाली. त्याला मनोऱ्यावरुन खाली उतरवण्यासाठी दूरसंचारच्या कर्मचाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले. मनोऱ्याची उंची खूप असल्यामुळे नाशिकच्या निफाड पोलिसांना माहिती देण्यात आली. तसेच अग्निशामक दलालाला देखील पाचारण करण्यात आले. पोलीस आणि अग्निशामक दलाच्या संयुक्त प्रयत्नानंतर या तरुणाला खाली उतरवण्यात आले. हा थरार तब्बल ४ तास सुरु होता.

तरुण नशेत असल्यामुळे कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. दूरसंचारचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस यंत्रणा आणि अग्रिशामक दलाच्या जवानांचीसुद्धा तारांबळ उडाली होती. दुपारी बारा वाजल्यापासून या तरुणाला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरु होते. शेवटी चार तासानंतर तरुणाची नशा उतरल्यावर तो खाली आला. तेव्हा सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान तरुणाला वर चढण्याचे कारण विचारले असता बायको माहेरी गेल्याने टॉवरवर चढलो असल्याचे तो म्हणाला.

- Advertisement -

हेही वाचा : जखमींवर उपचारांसाठी नकार देणाऱ्या रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करा; फडणवीसांची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -