घरमहाराष्ट्रनाशिकधुळ्यात पार्टीला विरोध करणार्‍या शेतकर्‍याची हत्या

धुळ्यात पार्टीला विरोध करणार्‍या शेतकर्‍याची हत्या

Subscribe

पार्टी करण्यास विरोध करणार्‍या शेतकर्‍याला मारहाण करुन हत्या केल्याची घटना साक्री तालुक्यातील सुरपान येथे शुक्रवारी (२१ जून) घडली.

पार्टी करण्यास विरोध करणार्‍या शेतकर्‍याला मारहाण करुन हत्या केल्याची घटना साक्री तालुक्यातील सुरपान येथे शुक्रवारी (२१ जून) घडली. यासंदर्भात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

रतीलाल सोनवणे हे शेतकरी अंगणात झोपले होते. यावेळी एका घरात तरुणांची पार्टी सुरू होती. मद्यपान केलेल्या तरुणांनी मोठा गोंधळ सुरू केला. त्यांना समजावण्यासाठी सोनवणे गेले. यावेळी चौघा मद्यपी तरूणांनी सोनवणे यांच्यावरच हल्ला चढवला. यावेळी संदीप देवरे, विशाल शिवाजी देवरे, भाउसाहेब भटु देवरे, किरण दादाजी देवरे यांनी बेदम मारहाण केल्याने सोनवणे गंभीर जखमी झाले. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच साक्री विभागाचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक देवीदास ढुमने यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने संशयितांचा शोध घेऊन ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -