घरमहाराष्ट्रनाशिककडाक्याची थंडी द्राक्षबागांच्या मुळावर

कडाक्याची थंडी द्राक्षबागांच्या मुळावर

Subscribe

थंडीमुळे निफाड तालुक्यातील द्राक्षबागांना फटका बसला आहे. यामुळे पंधराशे ते दोन हजार कोटीहून अधिक रुपयांचे द्राक्षांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच मिरचीला ही मोठा फटका बसताना दिसत आहे.

किमान तापमानाचा पारा पाच अंश सेल्सिअस पेक्षाही कमी राहिल्याने निफाड तालुक्यातील द्राक्षबागांना फटका बसला आहे. यामुळे पंधराशे ते दोन हजार कोटीहून अधिक रुपयांचे द्राक्षांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच मिरचीला ही मोठा फटका बसताना दिसत आहे. आज निफाड तालुक्यातील कसबे सुकेणा २.५ अंश सेल्सिअस, शिवडी ३.३ अंश सेल्सिअस, सारोळे खुर्द ३ अंश सेल्सिअस तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

थंडीचे द्राक्षांवर वाईट परिणाम

कडाक्याच्या थंडीचा मानवी जीवनाबरोबर शेती पिकांवरही चांगला-वाईट परिणाम होताना दिसत आहे. या थंडीचा गहू, हरभरा पिकांना फायदा होतो. मात्र, द्राक्षांवर वाईट परिणाम होत असून नुकसान होत आहे. बाष्पामुळे द्राक्षबागांवर हिमकण गोठल्याने तयार झालेले द्राक्षमणी भाजल्यागत झाले आहेत. याचा परिणाम म्हणून दोन लाख एकरपर्यंत पोहोचलेले नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे क्षेत्र धोक्यात आले आहे. यामुळे १५ टक्के नुकसान होणार असून पंधराशे ते दोन हजार कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान होण्याचा प्राथमिक अंदाज द्राक्ष उत्पादक संघाचे सदस्य कैलास भोसले यांनी व्यक्त केला आहे. नुकसानीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

- Advertisement -

हगामातील नीचांकी तापमानाची नोंद

३० डिसेंबरला तालुक्यातील उगाव आणि कसबे सुकेणा गावात शुन्य अंश सेल्सिअस, सारोळे येथे १ सेल्सिअस आणि २७ डिसेंबरला कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात १.८ सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

यामुळे द्राक्षबागांना फटका

२७ डिसेंबरपासून ते दोन जानेवारी पर्यंत ५ दिवस सलग किमान तापमान पाच अंश सेल्सिअसच्या खाली राहिले. तसेच ७ ते ९ जानेवारीपर्यंत ५ दिवस सलग किमान तापमान पाच अंश सेल्सिअसच्या खाली असल्यामुळे द्राक्षबागांना फटका बसला.

थंडीमुळे द्राक्षबागांवर ‘हे’ परिणाम

  • द्राक्ष पाने करपतात
  • सूर्यकिरणांच्या सहाय्याने पानांमधून होणारी अन्न तयार करायची प्रक्रिया थंडीमुुळे मंदावते.
  • तापमानात घसरण झाल्याने मुळांची सक्रीयता कमी होऊन अन्न प्रक्रियेवर दुहेरी फटका बसतो.
  • मण्यांमध्ये साखर उतरण्याचा कालावधी वाढणार.
  • फुलोर्‍यातून बाहेर पडून पाच मिलिमीटर आकाराच्या तयार झालेल्या मण्यांचा आकार दोन मिलिमीटर होण्याचा
  • कालावधी तीन दिवसांवरून सहा दिवसांपर्यंत जातो.
  • छाटणीनंतर १२० दिवसांनी द्राक्षाची होणारी काढणी १३० ते १४५ दिवसांपर्यंत जाणार.
Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -