घरातील पाण्याच्या टाकीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अजिंक्य नरेश साळवे (८, रा.श्रमिकनगर, सातपूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. शनिवारी (ता.३१) दुपारी २ वाजेच्या दरम्यान घरातील पाण्याच्या टाकीत पडला.
आजूबाजूला कोणीही नसल्याने व त्याला पाण्यातून बाहेर न येता आल्याने अजिंक्यचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. उपचारासाठी कुटुंबियांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले.