घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक जिल्हा बँक,कार्यकारी संस्थांमुळे शेतकरी आत्महत्या

नाशिक जिल्हा बँक,कार्यकारी संस्थांमुळे शेतकरी आत्महत्या

Subscribe

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी फोडले खापर

सहकार क्ष्रेत्राचा आत्मा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी संस्थांनी चांगले काम केले असते तर राज्यातील शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याची वेळच आली नसती. सद्यस्थितीला 11 हजार कार्यकारी संस्था व 13 जिल्हा बँका कर्ज वाटण्याच्या स्थितीत नाहीत. या संस्था कर्ज वाटणार नाहीत, तोपर्यंत येथील शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे मंगळवारी (दि.10) येथील लक्ष्मी लॉन्समध्ये आयोजित सहकार पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी देशमुख म्हणाले, सहकार क्षेत्र समृद्ध झाल्याशिवाय राज्य समृद्ध होणार नाही. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना राजकीय विचार बाजूला सारून संस्था मोठी करण्याचे प्रयत्न आवश्यक आहेत. राज्यातील 50 टक्के लोकसंख्या सहकार क्षेत्राशी जोडली गेली असली तरी सामान्य शेतकरी आणि समाजातील प्रत्येक घटक सहकाराशी जोडला जायला हवा. त्यासाठी इतर संस्थांनी चांगल्या संस्थांचा आदर्श घ्यावा. चुकीचे काम करणार्‍यांवर कारवाई करताना अडचणीतील संस्थांना मदत करण्यात येत आहे. ई-नामच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न होत आहे. 3500 विविध कार्यकारी संस्थांनी शासनाची मदत न घेता स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. अशा संस्थांनी तयार केलेला माल मॉलमध्ये विकण्याचे प्रयत्न महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी देशमुख यांच्या हस्ते ’सहकार गौरव’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

प्रमुख अतिथींच्या हस्ते सहकार महर्षि, सहकार भुषण आणि सहकार निष्ठ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ज्ञानदिप को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि. विक्रोळी (पु.) मुंबई या संस्थेला एक लाखचा सहकार महर्षि पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संस्थेने सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्त शाळांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. यावेळी सहकार आयुक्त व निबंधक सतीश सोनी, पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय समितीचे सदस्य अविनाश महागावकर, विभागीय सहनिबंधक (लेखा परीक्षण) आर. सी. शाह, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे उपस्थित होते.

- Advertisement -

अधिकार्‍यांना कानपिचक्या

सहकार क्षेत्रातील अनेक संस्था डबघाईस आल्या आहेत. त्यांना सावरण्यासाठी जास्तीत जास्त सभासदांना जोडून घेतले पाहिजे. अधिकार्‍यांच्या कृपेनी अनेक बनावट सदस्य कार्यरत आहेत. त्यांना अगोदर बाहेर काढले पाहिजे. प्रत्येक काम नियमांच्या चौकटीत बसत नाही; मात्र त्यासाठी इच्छाशक्ती महत्वाची असते, अशा कानपिचक्या देशमुख यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते सहकारमहर्षि, सहकारभूषण आणि सहकारनिष्ठ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -