घरमहाराष्ट्रनाशिकभंगार बसगाड्यांची प्रवाशांना झळ

भंगार बसगाड्यांची प्रवाशांना झळ

Subscribe

रस्त्यात बंद पडत असल्याने मनस्ताप; पंचवटी डेपोचे उत्पन्न घटले

एसटी महामंडळाच्या शहरात फेर्‍या करणार्‍या बसगाड्या तांत्रिक बिघाडाने रस्त्यात कोठेही बंद पडत असल्याने या भंगारगाड्यांचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ब्रेकडाऊन होणार्‍या गाड्या दूरूस्ती करण्यासाठी विलंब होण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने एसटीमुळे वाहतुक जाम होण्याचा प्रकार शहरात घडत आहे. शहरात फेर्‍या करणार्‍या पंचवटी डेपोचे उत्पन्न घटल्याने विभागीय लेखाधिकार्‍यांचे पत्र डेपो व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.
नाशिक शहर आणि शहरालगतच्या खेड्यांमध्ये एसटीच्या 137 बसगाड्या फेर्‍या करतात.

त्यात सर्वाधिक फेर्‍या या नाशिकरोड-पंचवटी मार्गावर होत असतात. सिटीबस गाड्यांची तांत्रिक बिघाडाची समस्या प्रवाशांच्या मुळावर उठलेली आहे. शहरातून वाहतूक करणार्‍या या गाड्या कधी सिग्नलवर बंद पडतात. कधी-कधी भर रस्त्यात ब्रेक डाऊन होतात. तर कधी-कधी त्यांचे गिअर उचलेले जात नसल्याने मार्गामध्ये खोळंबा ठरतात. त्यामुळे या गाड्यातील प्रवाशांना मधूनच प्रवास सोडून दूसर्‍या प्रवाशी साधनांचा आधार घ्यावा लागतो. प्रवास पूर्ण होण्याची खात्रीच प्रवाशांना मिळत नसल्याने नागरिकांची एसटीच्या प्रवाशीसेवेच्या नावाने ओरड सुरू ेकेलेली आहे.

- Advertisement -

नाशिक-पुणे मार्गावर नाशिकरोडला जाणार्‍या गाड्या हमखास बंद पडण्याचे नित्याचे झाले आहे. तांत्रिक बिघाडाने गाड्यांची वाताहत झालेली असल्याने त्या अवस्थेतही या गाड्या मार्गस्थ केल्या जात असल्याने त्यांचे बंद पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. शहरात गडकरी चौकात एका-पाठोपाठ एक अशा दोन शहर वाहतुकीच्या बसगाड्या सिग्नलवर बंद पडलेल्या होत्या. त्या गाड्यांमुळे वाहतुक खोळंबा होऊन मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याची घटना गत महिन्यात घडलेली होती. त्याचबरोबर गंगापूर रोडवरही पोलिस आयुक्तालयासमोर गाडीबंद पडलेल्याने वाहतुकीला अडथळा झालेला होता. तर प्रवाशांना ताटकळत पर्यायी वाहनांची वाट पहात थांबावे लागलेले होते.

एसटीच्या पंचवटी डेपोमधून होणार्‍या फेर्‍यांवर गाड्या बंद पडत असल्याने उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. गाड्या बंद पडतात म्हणून प्रवाशांची पाठ शहर बससेवेकडे फिरताना दिसत आहे. त्याचबरोबर गाड्यांच्या देखभाल-दूरूस्तीचा खर्चही भरमसाठ होत असल्याची चर्चा डेपो क्रमांक एकमध्ये आहे. त्यामुळे उत्पन्न वाढेल कसे, असा सवाल करण्यात येत आहे. एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद कमी झालेला नाही. पण वाहतुक सेवेत हमखास गाड्या बंद पडत असल्याने प्रवाशांना निश्चित वेळेत निहीत ठिकाणी आपण पोहोचू किंवा नाही याचा चिंता लागत असल्याने त्यांची या गाड्यांकडे पाठ फिरत आहे.

- Advertisement -

वरिष्ठ अधिकार्‍यांचा कानाडोळा

नाशिक शहरात दर दिवसाला किमान चार बसगाड्या बंद पडलेल्या दिसतील. नाशिक-पुणे रोड, त्र्यंबकरोड,गंगापूर रोड, पेठरोड, दिंडोरी रोड आदी मार्गावर गाड्या बंद पडून प्रवाशांना त्रास सहन करावा लागल्याचे चित्र नेहमी दिसत असते. एसटीच्या प्रवासीसेवेचा हा बट्याबोळ झालेला आहे. एसटीचा सर्वात महत्वाचा घटक प्रवाशी आहे. तो नाडावला जातोय, याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांचा कानाडोळा आहे. त्यामुळे एसटीचे नुकसान होत आहे. एसटीच्या गाड्यांमधून जो धुर निघतोय, हे तर पर्यावरण प्रदूषण वाढीला हातभार लावणारे आहे.
– जितेंद्र भावे, आम आदमी पक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -