घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदसर्‍याचा आनंद खरेदीने केला द्विगुणीत, बाजारपेठांमध्येही चैतन्य

दसर्‍याचा आनंद खरेदीने केला द्विगुणीत, बाजारपेठांमध्येही चैतन्य

Subscribe

दर घसरल्यानं उजळली सोन्याची बाजारपेठ

झेंडूच्या केशरी रंगाची तोरणं, हार, आपट्याच्या पानांची देवाण-घेवाण आणि गृहखरेदीसह नव्या वस्तूंच्या खरेदीचा आनंद अशा उत्साहभरल्या वातावरणात आज दसर्‍याचा सण सर्वदूर साजरा झाला.

दसर्‍याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यानं सोनं-चांदी खरेदीसाठी नाशिककरांनी सराफी पेढ्यांमध्ये गर्दी केली होती. या प्रतिसादामुळे सराफ बाजार उजळून निघाला होता. गेल्या काही दिवसांपासनं सोन्याच्या दरांत घसरण झाल्यानं ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी होती. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमसाठी ४७ हजार ७५०, तर २२ कॅरेटसाठी ४६ हजार ४०० रुपये होते. चांदीचा दर प्रतिकिलोसाठी ६५ हजार रुपये होता.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -