घरमहाराष्ट्रनाशिकउत्तर महाराष्ट्रात ‘द्वारकाधीश’चे सर्वाधिक गाळप

उत्तर महाराष्ट्रात ‘द्वारकाधीश’चे सर्वाधिक गाळप

Subscribe

उत्तर महाराष्ट्रात द्वारकाधीश कारखान्यातील १९ वर्षातील सर्वात जास्त उतार्‍याची नोंद झाली आहे.

सटाणा शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याचा २०१८- १९ च्या १९ व्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता झाली. 5 लाख ४२ हजार ३७४. ९०९ मेट्रिक टन उसाचे गाळप करून सहा लाख २७ हजार २९० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले. साखर उतारा ११: ५७ मिळाला आहे. द्वारकाधीश कारखान्यातील १९ वर्षातील सर्वात जास्त उतार्‍याची नोंद झाली असून उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त गाळप झाल्याची माहिती कारखाना अध्यक्ष शंकरराव आनंदा सावंत यांनी दिली.

कारखान्याच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीतला दुष्काळी परिस्थितीतील ११: ५७ हा सर्वात जास्त उतारा मिळाला आहे. अध्यक्ष सावंत यांनी दोन वर्षापासून शेतकी विभागाचा कारभार हाती घेऊन व्ही.एस.आय, पुणे या नामांकित संशोधन संस्थेचे व ऊस विकास योजना तसेच तज्ञ संजीव माने यांचे मार्गदर्शन शेतकरी महिला व पुरूष अभ्यास दौरा, प्रत्यक्ष बांधावर मार्गदर्शन केल्यामुळेच शेतकर्‍यांनी सरासरी ५० मेट्रिक टन उसाचे उत्पन्न एकरी घेतले आहे. बागलाण, कळवण, साक्री, नवापूर तसेच कार्यक्षेत्राबाहेरील निफाड, चाळीसगाव, शिरपूर परिसरातील नोंदलेला व बिगर नोंदला शेतकर्‍यांचा शेवटचा ऊस तुटेपर्यंत कारखाना चालू ठेवला होता. ऊस उत्पादकाबरोबरच तोडणी, वाहतूक कामगार यांचेही नियमाप्रमाणे एका रकमेत बिल अदा करण्यात आले आहे. यामुळे ऊस उत्पादक, कर्मचारी व इतर घटकांचा द्वारकाधीश साखर कारखान्यावरील आजपर्यंतच्या परंपरेनुसार विश्वास दृढ झाला आहे. ऊस उत्पादक, अधिकारी, कर्मचार्‍यांच्या प्रयत्नामुळे उद्दिष्टे साध्य झाले आहे.

- Advertisement -

गाळपाची सांगता झाल्यामुळे अध्यक्ष सावंत, उपाध्यक्ष चंद्रकला सावंत यांच्या हस्ते शेवटचे बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक व गव्हाण पूजन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी भालेराव, इथेनॉल प्रकल्प अधिकारी आर. डी. भामरे, शेतकी अधिकारी विजय पगार, मुख्य अभियंता एस. ई .साळुंखे, रसायन तज्ञ एम. डी. कचवे, भूषण नांद्रे, अरविंद सोनवणे, नाना पाटील, परेश साखरे, सतीष सोनवणे, विजय चौधरी, उत्तम शेलार उपस्थित होते.

पदाधिकारी म्हणतात…

दुष्काळी परिस्थितीत द्वारकाधीश कारखान्याने ऊस उत्पादकांना एफ. आर. पी. नुसार २३७० रूपये एकरकमी वेळीच अदा केले आहेत. विजेच्या उत्पन्नामूळे कारखान्याला उउत्पादकांचा मोबदला देणे शक्य झाले. – शंकरराव सावंत,
अध्यक्ष, द्वारकाधीश साखर कारखाना

- Advertisement -

द्वारकाधीश साखर कारखान्याचा १० मे. क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प अंतर्गत या हंगामात तीन कोटी १८ लाख ९४ हजार दोनशे युनिट वीज वितरण कंपनीस वितरण करण्यात आली आहे. – कैलास सावंत, संचालक

द्वारकाधीश साखर कारखाना अंतर्गत इथेनॉल प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून सदर प्रकल्प गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नियोजित चालू करण्यात येईल. – सचिन सावंत, कार्यकारी संचालक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -