घरमहाराष्ट्रनाशिकमूर्तीकारांमधील किर्ती ; साकारते लोभस रुप बाप्पाचे!

मूर्तीकारांमधील किर्ती ; साकारते लोभस रुप बाप्पाचे!

Subscribe

पर्यावरण पूर्वक गणेश मूर्ती तयार करत किर्ती महाजन यांचा लक्षवेधी उपक्रम

अंगभूत कलेचा वारसा जपताना त्यातून पहिला हेतू साध्य केला तो स्वआनंदाचा या आनंदाचे भरभरून कौतुक झाल्याने तो घरोघरी पोहोचवण्याचे व्रत येथील किर्ती महाजन यांनी जपले आहे. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती स्वतःच रंगवून अनेक कुटुंबांना त्या देतात. मागील सात वर्षांपासून सुरू असलेला त्यांचा हा उपक्रम आता नावारुपाला येत आहे. बाप्पाचे विसर्जन घरच्या घरी बादलीत करीत त्या पर्यावरण जागृतीचा संदेश देखील देतात.

प्रत्येक सखीमध्ये काही ना काही खास क्षमता असते. योग्य वेळ येताच त्या कलागुणांना उचित व्यासपीठ मिळते आणि त्या कलेने जीवन उजळून जाते. त्यातून सामाजिकता उदयास येते. नाशिकच्या किर्ती नितीन महाजन यांनी आजवर सात वर्षांपासून शाडू मातीपासून अनेक सुबक गणेश मूर्ती घडवल्या आहेत. प्रसिद्ध मूर्तीकार आनंद तांबट यांच्याकडून त्यांनी मूर्तीकलेचे धडे गिरवले. मातीत माती मिसळल्यावर त्यातून सुंदर मूर्ती घडत असते.

- Advertisement -

पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत त्यांचा हा उपक्रम लक्षवेधी ठरला आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षीचा बाप्पा बादलीत विसर्जित करून पुन्हा तीच माती पुढील वर्षाच्या बाप्पासाठी त्या वापरत असतात. कारण शाडू माती चिकट असल्याने ती कुंडीतल्या झाडांना टाकता येत नाही. शिवाय वारंवार एकाच ठिकाणाहून शाडू मातीचे उत्खनन केल्यास भविष्यात ही मातीही मिळणे मुश्किल होईल. त्यामुळे शाडू मातीचा पूनर्वापर करण्याकडे त्यांचा कल असतो. घरसंसार सांभाळून कलानिर्मितीचा आनंद घेत असतात. या कामात त्यांचे पती नितीन महाजन आणि मुले प्रांजल व शुभम यांचे त्यांना सहकार्य मिळत असते.

गेल्या सात वर्षांपासून मी शाडू मातीची मूर्ती बनवत आहे. महापालिकेच्या शाळेसह युनिव्हर्सल अ‍ॅकडमीत मूर्तीकामाच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. मूर्ती कामातून मिळणारे पैसे गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केले जातात.- किर्ती महाजन, मूर्तीकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -