एकनाथ खडसेंना ‘ईडी’कडून चौकशीची नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आल्याचे समजत आहे. ‘ईडी’ने 30डिसेंबर रोजी एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे.

एकनाथ खडसे यांनी ऑक्टोबर महिन्यात भाजपला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनीसुद्धा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली. एकनाथ खडसे यांनी भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटीचा घोटाळा उघड करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. यामध्ये भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा होती. ईडीकडून नोटीस आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.