घरमहाराष्ट्रनाशिकशिक्षणाधिकारी डॉ.झनकर यांना एक दिवसाची कोठडी

शिक्षणाधिकारी डॉ.झनकर यांना एक दिवसाची कोठडी

Subscribe

कारचालक ज्ञानेश्वर येवले व प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना न्यायालयीन कोठडी

नाशिक : आठ लाख रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी फरार झालेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर-वीर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सकाळी 10 वाजता सिन्नर येथून ताब्यात घेतले. यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्यांचे साथीदार कारचालक ज्ञानेश्वर येवले व प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
शिक्षणाधिकारी डॉ.झनकर यांना ठाण्यच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.10) सायंकाळी रंगेहात पकडले होते. त्यानंतर दोन दिवस त्या पोलिसांना गुंगारा देवून फरार झाल्या होत्या. या दरम्यान त्यांनी अ‍ॅड.भिडे यांच्या मार्फत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.अखेर पोलिसांनी त्यांना सिन्नर येथून ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. या अर्जावर न्यायालयात शुक्रवारी (दि.13) सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. तर उर्वरीत दोघांना 14 दिवसांची कोठडी सुनावल्याचे समजते.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -