घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रवातावरणातील बदलांचा परिणाम : बालकांसह ज्येष्ठही सर्दी, खोकल्याने बेजार

वातावरणातील बदलांचा परिणाम : बालकांसह ज्येष्ठही सर्दी, खोकल्याने बेजार

Subscribe

नाशिक : बदलत्या हवामानामुळे दिवसा उकाडा आणि रात्री थंडी असा विरोधाभास असल्याने आणि नवीन आलेल्या विषाणूंच्या प्रादूर्भावामुळे लहान मुलांपासून वयोवृद्धांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या साथीच्या आजारामुळे नाशिक शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखीच्या रुग्णांची वाढ झाली आहे. शिवाय, या संसर्गजन्य आजाराचा कालावधी वाढला आहे. अंगावर मुलांसह वयोवृद्धांनी दुखणे काढू नये, एक ते दोन दिवसांत तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घावेत, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

नाशिक शहरात कधी थंडी तर कधी कोरड्या वातावरणामुळे सध्या विविध आजारांनी डोके वर काढले आहे. लहान मुले, वृद्ध व रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना साथीच्या आजाराची लागण लवकर होत आहे. शहरात घरोघरी सर्दी, खोकला व तापाच्या रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. लहान मुलांना घसादुखीपासून थंडी, ताप, सर्दी, अशक्तपणा वाटणे, डोळ्यांची जळजळ होणे, खोकल्याचा त्रास होत आहे. सध्या साथीच्या आजारांचा कालावधी १० ते १५ दिवसांचा झाला आहे. अनेकजण घरगुती उपाय करत आहे. मात्र, ते त्यांना त्रासदायक ठरत आहे. परिणामी, अनेकजण फॅमिली फिजिशियन डॉक्टरांकडे जात आहेत. रुग्णांवर वेळीच उपाचर केल्याने व्हायरल इन्फेक्शन तीव्रता कमी होत आहे. बदलते हवामान मानवी आरोग्यासाठी विपरीत असले तरी नागरिकांनी सकस आहार, पुरेशी झोप, सोशल डिस्टन्सिंग, गर्दीत जाणे टाळल्यास संसर्गजन्य आजारापासून दूर राहता येईल, असेही अनेक डॉक्टरांनी सांगितले.

अशी घ्या काळजी
  • गर्दीत जाणे टाळा.
  • ताजे खाद्यपदार्थ खावेत.
  • सर्दी-खोकला वाढल्यास
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावेत.
  • थंड पाणी टाळावे.
  • तळलेले पदार्थ खाणे टाळावेत.

दिवस आणि रात्रीच्या तापमानात बदल झाल्याने जिल्हा रुग्णालयात दररोज सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण येत आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. हात स्वच्छ धुवावेत. मास्कचा वापर करावा. : डॉ. आनंद पवार, वैद्यकीय अधिकारी, सिव्हिल

परिस्थिती भितीसारखी नसली तरी काळजी घेणे गरजेचे आहे. तापासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ मास्क वापरा जेणेकरुन कुटुंबातील सदस्य सुरक्षित राहतील. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरु करावेत. योग्य प्रमाणात सकस आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे, व्हिटॅमिन सी युक्त खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करावा. : डॉ. समीर चंद्रात्रे, माजी अध्यक्ष, आयएमए

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -