नाशिक मध्ये ईदची नमाज उत्साहात अदा

नाशिक : शहरातील पारंपरिक ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज अदा केली. काल (दि.२) ३० रोजे पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पवित्र रमजान महिन्याची सांगता झाली. जिल्हाभरात ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद आज साजरी करण्यात आली. शहरातील शहाजहाँनी ईदगाह मैदान येथे हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सकाळी १० वाजता समुहीक नमाज पठण केले. शहर-ए-खतीब हाफिज हिसमुद्दीन अशरफी यांच्या करावी हा नमाज पठणाचा सोहळा पार पडला.
गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना सामूहिक पद्धतीने रमजान ईद निम्मित नमाज पठण करता आले नव्हते. त्यामुळे यंदा मुस्लिम समाजात मोठा उत्साह दिसून आला. एप्रिल महिन्याच्या रणरणत्या उन्हाळ्यात यंदाचा रमजान महिना असूनही अनेक अबाल-वृद्धांनी हा अत्यंत कठीण उपवास केला, त्याच सोबत अल्लाहची उपासनाही (ईबादत) केली. असे शहर-ए-खतीब अशरफी यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी जगात आणि भारतात शांतीसाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली.