Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी आठ सराईत गुन्हेगार तडीपार

आठ सराईत गुन्हेगार तडीपार

Related Story

- Advertisement -

नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. सिन्नरफाटा येथील हुसेन फिरोज शेख (१८), गणेश ऊर्फ छकुल्या मधुकर वाघमारे (वय १९), पराग ऊर्फ गोट्या राजेंद्र गायधनी (व २७), अंबड येथील सतीश बबन माने (वय २३), लेखानगर येथील राजू ऊर्फ राजेश कचरू अढांगळे, शिवाजी चौक येथील अजय संजय आठवले (वय २५), अक्षय संजय आठवले (वय २१), सातपूर येथील अजय महादू मोरे (वय २६) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

नाशिकरोड, उपनगर, सातपूर, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत संघटित गुन्हेगारी वाढू लागली आहे. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी आणि गुन्हेगारांच्या टोळ्या फोडून काढण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी पोलीस ठाण्यांकडून तडीपारीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावाची चौकशी करत आठ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. तडीपार गुन्हेगार शहरात दिसून आल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे.

- Advertisement -