घरताज्या घडामोडीरविवारी आठ संशयित रुग्ण दाखल; नाशिक जिल्हा रुग्णालय १, डॉ. झाकीर हुसेन...

रविवारी आठ संशयित रुग्ण दाखल; नाशिक जिल्हा रुग्णालय १, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय 7

Subscribe

जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्णांच्या संख्येत रविवारी (दि.५) वाढ झाली. कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसत असलेले नवीन आठ कोरोना संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालय व डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल झाले. पॉझिटिव्ह असलेल्या युवकाची प्रकृती स्थिर आहे. २ ते ५ एप्रिल दरम्यान रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या ४७ रुग्णांचे रिपोर्ट प्रलंबित असून त्यांचा अहवाल रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात एक आणि नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय सात असे आठ नवीन कोरोना संशयित रुग्ण रविवारी (दि.५) दाखल झाले. धुळे शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेल्या ४७ कोरोना संशयितांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. आत्तापर्यंत ८६६ नागरिक परदेशातून आलेले आहेत. त्यापैकी ४५१ नागरिकांचे होम क्वारंटाइन पूर्ण झालेले आहे. उर्वरित ३६० नागरिक होम क्वारंटाइनमध्ये असून त्यांची आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी सुरु आहे.

- Advertisement -

नाशिक कोरोना क्विक अपडेट

पॉझिटिव्ह रुग्ण ०१

निगेटिव्ह रुग्ण 173

- Advertisement -

प्रलंबित रिपोर्ट 47

आत्तापर्यंत तपासणी केलेले नमुने 221

रविवारी दाखल झालेले रुग्ण 08

नाशिक जिल्हा रुग्णालय 01

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय 07

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -