खडसेंनी केला पक्षांतराच्या चर्चेचा इन्कार, म्हणाले, व्हायरल क्लिपकडे दुर्लक्ष करा

काही मंडळींमुळे आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप खडसेंनी केला

eknath khadse
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाल्यानं भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. त्यातच आता खडसेंची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. त्यातल्या संभाषणात ’आपण महिनाभरात भाजप सोडणार असून, दुसर्‍या पक्षात काय पद मिळतं, केवळ याची प्रतीक्षा आहे’, असा संवाद खडसेंनी कार्यकर्त्यांसोबत  केला आहे. या चर्चेने खडसेंच्या पक्षांतराची पुन्हा चर्चा सुरू झालीय. मात्र, खडसेंनी पक्षांतराचा इन्कार केला आहे.

एकनाथ खडसे यांनी पक्षातील काही मंडळींमुळे आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून खडसे हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, कार्यकर्ते अशा प्रकारची विचारणा करतच असतात. तो कॉल चुकीचा असल्यानं ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचा खुलासा खडसेंनी केलाय.