घरमहाराष्ट्रनाशिकमी टेन्शन फ्री, आता इतरांना टेन्शन : खडसेंचा भाजप नेत्यांना इशारा

मी टेन्शन फ्री, आता इतरांना टेन्शन : खडसेंचा भाजप नेत्यांना इशारा

Subscribe

जळगावला जाताना नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर साधला संवाद

गेली चार वर्षे माझ्या  मागे विविध प्रकारच्या चौकशा लावण्यात आल्या. अ‍ॅन्टी करप्शनही लावले गेले. त्यातून आता मी बाहेर पडलो आहे. त्यामुळे माझ्या डोक्यावरचे सर्व टेन्शन गेले आहे. आता इतरांना टेन्शन देण्याचे काम मी करणार असल्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी नाव न घेता भाजप नेत्यांना इशारा दिलाय.

खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शनिवारी (दि.२४) ते नाशिकमार्गे जळगावला जात असताना नाशिक येथे शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी राष्ट्रवादीसह लेवा-पाटील समाज पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबई येथील प्रवेश सोहळयाच्या कार्यक्रमात बोलताना खडसे यांनी आपल्या डोक्यावरचे ओझे कमी झाल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत विचारले असता त्यांनी हा इशारा दिला. माझी नेमकी चूक काय याबाबत मी विधानसभेत विचारले परंतु मला अजूनही याचे उत्तर मिळू शकलेले नाही. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सभागृहाबाहेर बोलत आहेत मग, सभागृहात मला उत्तर का दिले नाही, असा सवाल उपस्थित करत आता या सर्व चौकशांमधून टेन्शन फ्री झालो आहे यापुढे इतरांना टेन्शन देण्याचे काम करणार असल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -