घरताज्या घडामोडीएकवीरा विद्यालयाचा निकाल ऑनलाईन

एकवीरा विद्यालयाचा निकाल ऑनलाईन

Subscribe

मुंबई : कांदिवली-चारकोप येथील श्री एकवीरा ज्ञानप्रसारक मंडळाच्या श्री एकवीरा विद्यालय या मराठी माध्यम शाळेने लेव्हंट टेक्नॉलॉजीसच्या सहायाने इयत्ता नववीचा निकाल 25 मे रोजी ऑनलाईन प्रसिध्द केला आहे. तसेच इयत्ता पाचवी व आठवीचा निकालही प्रसार माध्यमाचा वापर करुन जाहीर केला. निकाल सुलभ व व्यवस्थितरित्या विद्यार्थी व पालकांना देण्यात आला. घरी राहूनच निकाल वितरण व्यवस्थितरित्या पार पडल्याने शिक्षक व पालकांनी समाधान व्यक्त केले.

लॉकडाऊनमुळे शिक्षण क्षेत्राला फार मोठ्या बदलांना सामोरे जावे लागत आहे. परंतु हे सर्वच बदल नकारार्थी नसून यापैकी काही बदल हे सकारात्मक आणि आधुनिक आहेत. लेव्हंट टेक्नॉलॉजीस ही कंपनी संगणक क्षेत्रात गेली दहा वर्षे कार्यरत असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात विविध सॉफ्टवेअर विकसीत केले आहेत. गेली दहा वर्षे विविध शाळांना मुख्यत: मराठी माध्यमांच्या शाळांना ही कंपनी ‘आयसीएसई’ आणि ‘सीबीएसई’ शाळांप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान सेवा पॅकेजच्या स्वरुपात पुरवत आहे. एकवीरा विद्यालयाचा निकाल ऑनलाईन प्रसिध्द झाल्याने अशा प्रकारचे बदल मराठी शाळांना गतवैभव मिळवून देतील, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष डॉ.हेमचंद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे. शाळेचा निकाल जाहीर करताना शिक्षण संस्थेचे विश्वस्त कार्यवाह विनायक पाटील, उपाध्यक्ष अजित पाटील, खजिनदार प्रकाश पाटील, शैक्षणिक समन्वयक प्रमुख प्रभाकर किणी उपस्थित होते. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक नागेंद्र कागीनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांनी लेव्हंट टेक्नॉलॉजीसच्या सेवांचे आणि संगणक प्रणालीचे खूप कौतुक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -