घरताज्या घडामोडीमतदार यादीतील त्रुटी ५ ऑक्टोबरपर्यंत दूर करा

मतदार यादीतील त्रुटी ५ ऑक्टोबरपर्यंत दूर करा

Subscribe

निवडणूक आयोगाचे प्रशासनाला निर्देश, २ लाख ८७ हजार नावं दुबार आढळल्याने खळबळ

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमधल्या मतदार याद्यांमधील घोळ उघडकीस आला असून, तब्बल २ लाख ८७ हजार नावे दुबार आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही नावं रद्द करण्याची मागणी करत शिवसेनेने याबाबत थेट राज्य निवडणूक आयोगाकडे धाव तक्रार केलीय. निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतलेल्या आढावा बैठकीत ५ ऑक्टोबरपर्यंत मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिलेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यातील २८८ मतदारसंघातील निवडणूक कामाचा आढावा घेताना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. नाशिकमध्ये ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमधील दुबार नावाचा मुद्दा गाजतोय. नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या तीन मतदार संघाच्या याद्यांमध्ये शे-दोनशे नव्हे, तर तब्बल २ लाख ८७ हजार नावं दुबार आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. आजच्या बैठकीत याबाबतही चर्चा करण्यात आल्याचे समजते. १ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तत्पूर्वी म्हणजेच ५ ऑक्टोबरपर्यंत मतदार यादीतील त्रुटी दूर करून आयोगाला अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

मतदारसंघनिहाय दुबार मतदारांची अशी आहे संख्या

  • नाशिक पश्चिम मतदारसंधात १ लाख २२ हजार २४२
  • नाशिक पूर्व मतदारसंघात ८८ हजार ९३२
  • नाशिक मध्य मतदारसंघामध्ये ७६ हजार ३१९
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -