Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक निवडणूक मविप्र संस्थेची; पेरणी विधानसभा, लोकसभेची !

निवडणूक मविप्र संस्थेची; पेरणी विधानसभा, लोकसभेची !

Subscribe

नाशिक : राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून लौकिक असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीच्या आडून आता विधानसभा व लोकसभा निवडणुकीची पेरणी केली जात असल्याने सध्याच्या निवडणुकीत धडाडणार्‍या तोफा भविष्यात पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समित्या व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे मविप्र निवडणुकीत मातब्बर नेत्यांची ‘एन्ट्री’ झाली. इतकेच नाही तर लोकसभा व विधासनभेच्या आगामी निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनही काही इच्छूक रिंगणात उतरले आहेत. यात प्रथमत: लोकसभेचा विचार केला तर नाशिक मतदारसंघात सिन्नरचे आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे हे इच्छुक आहेत. पण त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळवावी लागेल, त्यानंतर पुढील लढाई होईल. तत्पूर्वी त्यांनी मविप्रच्या निमित्ताने मैदान गाजवण्यास सुरुवात केली आहे. तर भाजपचे प्रबळ दावेदार असलेले चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल आहेर हे देखील ‘प्रगती’च्या व्यासपीठावर दिसतात. अर्थात, ते स्वत: या निवडणुकीत उमेदवार राहणार नसले तरी लोकसभेच्या निवडणुकीच्याद़ृष्टीने ही निवडणूक म्हणजे ‘सेमी फायनल’च म्हटली पाहिजे. त्यामुळे केदा आहेर यांचाही विधानसभेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यांच्याविरोधी पॅनलचा विचार केला तर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल हे ‘परिवर्तन’च्या मानसिकतेत असून त्यांनाही विधानसभेचे मैदान गाजवायचे आहे. विरोधी पॅनलमध्ये सहभागी होऊन त्यांनी ‘प्रगती’ला थांबवण्याचा निर्धार केलेला दिसतो. तर माजी आमदार उत्तमबाबा भालेराव व बाजार समितीचे सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे या दोघांनाही ‘प्रगती पॅनल’ची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा लागून आहे. दोघांपैकी एकाला संधी मिळेल. यातूनच विधानसभेची बिजे रोवली जातील. निफाड तालुक्यात थेट विधासनसभेची समीकरणे मांडली जात नसली तरी आजी-माजी आमदारांची राजकीय खेळी ‘मविप्र’ निवडणुकीभोवती पिंगा घालत आहे. कधी विरोधात तर कधी सत्ताधारी गटाबरोबर मिळते-जुळते घेवून आपली राजकारण साधण्याचा प्रयत्न होताना दिसतो.

- Advertisement -

नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड.राहुल ढिकले हे खुलेपणाने ‘प्रगती’च्या व्यासपीठावर विराजमान होऊन विरोधकांवर त्यातही विशेषत: आमदार माणिकराव कोकाटेंवर शरसंधान साधत आहेत. यातून संभाव्य लोकसभेची ही नांदीच असल्याचे म्हटले जाते. अ‍ॅड. ढिकले यांनाही लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. उमेदवारी मिळालीच तर आमदार कोकाटेंविरोधातच आपला सामना रंगण्याची शक्यता गृहित धरुनच ते मैदानात उतरलेले दिसतात. अर्थात, विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे मविप्र निवडणुकीत कुठल्याच व्यासपीठावर नसल्यामुळे त्यांनी सावध भूमिका
ठेवल्याचे दिसून येते. सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे हे सत्ताधारी गटाकडे आहेत. तर येवल्यात बनकर यांच्या विरोधामुळे माजी आमदार मारोतराव पवार हे सत्ताधारी गटात दिसतात. ज्या मतदारसंघांमध्ये विधासभेची पेरणी होऊ शकते अशा ठिकाणच्या मातब्बर नेत्यांनी आता कुठल्यातरी एका पॅनलची भूमिका स्विकारली आहे. त्यामुळे एक तर सत्ताधारी गटात किंवा विरोधी गटात सामील होऊन प्रचाराच्या तोफा पेटवण्याचे काम सध्या जोमाने सुरु आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -