घरमहाराष्ट्रनाशिकमतदार यादी तपासणी सुरू

मतदार यादी तपासणी सुरू

Subscribe

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निवडणूक शाखेजवळ मतदार याद्यांची तपासणी सुरू

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता याद्या तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात मतदार यादी पडताळणी मोहीम राबवण्यात येत असून मयत, दुबार मतदारांची नावे वगळण्यात येत आहेत.

लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने मतदारयाद्या परिपूर्ण आणि दोषरहित करण्यासाठी जिल्हाभर व्यापक मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत सर्वसामान्य नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या सहकार्याने नागरिकांना मतदार नोंदणीबाबत जागरूक करण्याची मोहीम महत्त्वाची ठरली. या मोहिमेमुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यात यश आले आणि त्याचाच परिणाम म्हणून जवळपास ४० हजार मृत आणि दुबार मतदारांची नावे यादीतून वगळ्यात आली, तर सुमारे २८ हजार नवीन मतदारांच्या नावांची नोंदणी होऊ शकली. मतदार कर्मचार्‍यांनी बजावलेल्या भूमिकेमुळेदेखील हे काम वेळेत पूर्ण होऊ शकल्यामुळे निवडणुकीच्या तयारीला वेळ मिळाला आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी सूरज मांढरे आाणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी केलेल्या नियोजनानुसार १५ जुलै रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्याची तारीख निश्चित केलेली असल्यामुळे मतदार कर्मचार्‍यांबरोबरच निवडणूक नायब तहसीलदार, निवडणूक लिपिक यांच्याबरोबरच निवडणूक विभागाच्या कर्मचार्‍यांनी दिलेल्या मुदतीत काम करून जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकार्‍यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे प्रारूप मतदारयाद्या तयार झालेल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निवडणूक शाखेजवळ सध्या या मतदार याद्यांची तपासणी सुरू झाली आहे. याद्यांची बिनचूक छपाई, पाने तसेच मतदार याद्यांचा क्रम तसेच मतदारांची छायाचित्रे आदींची तपासणी करूनच त्यावर निवडणूक शाखेचे शिक्के मारले जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -