घरमहाराष्ट्रनाशिक‘स्मार्ट’ रस्त्यांना लाभणार इलेक्ट्रिक बसेसचे कोंदण

‘स्मार्ट’ रस्त्यांना लाभणार इलेक्ट्रिक बसेसचे कोंदण

Subscribe

तुटलेल्या काचा, गळके छत, खिडक्यांचा खडखडाट आणि धूर ओकत धावणार्‍या शहर बसेसचा मनस्ताप देणारा प्रवास ई-बसेसमुळे लवकरच आरामदायी होणार आहे.

तुटलेल्या काचा, गळके छत, खिडक्यांचा खडखडाट आणि धूर ओकत धावणार्‍या शहर बसेसचा मनस्ताप देणारा प्रवास ई-बसेसमुळे लवकरच आरामदायी होणार आहे. दिमाखदार, आकर्षक आणि शून्य प्रदूषण, अशी प्रमुख वैशिष्ट्ये असलेल्या या बस स्वच्छ, सुंदर आणि हरित नाशिकला पूरक ठरतील.

ढासळते पर्यावरण आणि मोडकळीस आलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्याच्या हेतूने नाशिक महापालिकेने सीएनजी, इलेक्ट्रिक आणि डिझेल बसेससाठी निविदा काढल्या आहेत. त्यामुळे या तिन्ही प्रकारांत सर्वश्रेष्ठ ठरेल, अशा इलेक्ट्रीक बसेसकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. त्यातच गुरुवारी, अशाच प्रकारातील एक बस नाशिकच्या रस्त्यांवर दिसल्याने नाशिककरांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले होते. सोशल मीडियावरही याच विषयाची चर्चा होती. दरम्यान, वाढता तोटा लक्षात घेता एसटी महामंडळाने पाच वर्षांपूर्वीच शहर बससेवा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, तिजोरीतील खडखडाट बघता महापालिकेनेही टाळाटाळ सुरू ठेवली होती. परिणामी, महापालिका आणि एसटी यांच्यातील टोलवाटोलवीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असलेल्या चाकरमान्यांसह शालेय विद्यार्थ्यांचेही पुरते हाल झाले. आता महापालिकेने ही सेवा ताब्यात घेण्यासाठी पावले उचलल्याने नाशिककरांना लवकरच ध्वनी आणि वायू प्रदूषणापासून मुक्तता देणार्‍या इलेक्ट्रिक बसमधून सफरीचा आनंद घेता येणार आहे.

इथे क्लिक करा आणि बघा बसची खासियत

ई-बसेसची वैशिष्ट्ये

  • इंजिन नसल्याने हादरे बसणार नाहीत
  • विजेवर धावणार असल्याने प्रदूषण नाही
  • चालकासाठी संपूर्ण ऑटोमेटेड डिजीटल पॅनल
  • चालकनियंत्रित हायड्रोलिक दरवाजे
  • प्रशस्त आसनव्यवस्था, आकर्षक रचना
  • सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, अग्निप्रतिबंधक यंत्रणा
  • मोबाईल चार्जिंगची सुविधा
  • पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम
  • थांब्यांची माहिती देणारा डिजीटल बोर्ड
  • इमर्जन्सी स्टॉप बटन
  • प्रखर दिवे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -