घरताज्या घडामोडीआपत्ती निवारण दिनानिमित्त संकटकालीन बचाव प्रात्याक्षिके

आपत्ती निवारण दिनानिमित्त संकटकालीन बचाव प्रात्याक्षिके

Subscribe

जागतिक आपत्ती निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संकटकालीन बचाव प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. आपत्तीच्या प्रसंगात स्वतः सोबत इतरांचा बचाव कसा करावा, याबाबत योग्य माहिती नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे आपत्तीच्या प्रसंगी बचाव कार्य कसे करावे, याबाबतची योग्य माहिती व शिक्षण असेल ते संवादाच्या विविध माध्यमातून सर्वांपर्यंत सहज पोहचवता येते आणि यातूनच आलेल्या आपत्तीचा सामना करणे सहज शक्य होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी केले आहे.

यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व भोसला मिलट्री स्कुलच्यावतीने एखादी इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली तर अशा आपत्तीच्या परिस्थितीत कशा पद्धतीने बचाव कार्य केले जाते, याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. यात सक्षम व्यक्तीला, जखमी परंतु शुद्धीवर असलेल्या व्यक्तीला खाली उतरविणे, जखमी व्यक्तीला पाठीवर घेऊन खाली उतरणे, बेशुद्ध व्यक्तीला स्ट्रेचरवर खाली सोडणे, बेशुद्ध व्यक्तीला वरती घेणे अशा विविध प्रात्यक्षिकांचा समावेश होता. सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे भोंसला अ‍ॅडव्हेंचर फाउंडेशन, नाशिक या संस्थेच्या संतोष जगताप, संतोष वाबळे, सुजित पंडित, योगेश सहारे, विक्रम बेंडकुळे, वंदना कुलकर्णी, चेतना शर्मा, साक्षी गोयल यांनी वरील प्रात्याक्षिक दाखविले. यावेळी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, गौण खनिज अधिकारी आनंद पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे, तहसीलदार रचना पवार यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

नियोजनातून आपत्तीवर मात शक्य
आपत्ती आपण कशा पद्धतीने हाताळतो, यावर त्या आपत्तीच्या दुष्परिणामांची दाहकता अवलंबून असते. त्यामुळे आपत्तीच्या परिस्थितीला सामोरे जाताना कोणत्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी, याची माहीती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. जपान हा देश आपत्ती निवारणाच्या बाबतीतील अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे, आपत्तीचा अंदाज घेवून त्यावरच्या उपाययोजनांचे पुर्वनियोजन करण्यात येते. त्यानंतरही आपत्ती आलीच तर केलेल्या पूर्व नियोजनामुळे त्यावर तात्काळ मात करता येते असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -