घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रहेल्मेट, मास्क, जॅकेट परिधान करुन कर्मचार्‍याने केली ऑफिसमध्ये चोरी

हेल्मेट, मास्क, जॅकेट परिधान करुन कर्मचार्‍याने केली ऑफिसमध्ये चोरी

Subscribe

ऑफिसमधील संगणक चोरीसाठी कर्मचार्‍याने अनोखी शक्कल लढवली. मात्र, तीच शक्कल त्याच्या अंगलट आल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीसाठी कर्मचार्‍याने हेल्मेट, मास्क, हॅण्डग्लोज व जॅकेट परिधान केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून तीन डेल, एचपी कंपनीचे संगणक, कि-बोर्ड, माऊस, सीपीयु जप्त केला. रिचर्ड जेम्स डिसोजा (रा.वंदे मातरम अपार्टमेंट, नंदनवन सोसायटी, आवटेमळा, जय भवानी रोड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

बोधले नगर, नाशिक येथील जितेश किसन जाचक यांच्या ऑफिसमधून चोरट्याने तीन डेल व एचपी कंपनीचे संगणक, कि बोर्ड, माऊस, सीपीयु लंपास केला होता. याप्रकरणी जाचक यांनी ७ जानेवारी २०२२ रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मुंबई नाका गुन्हे शोध पथकाने तपास सुरु केला.पथकाने सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. चोरी करतेवेळी संशयित व्यक्ती हेल्मेट परिधान करुन तोंडाला मास्क, हॅण्डग्लोज व अंगावर जॅकेट परिधान केल्याचे दिसून आले. पथकाने पुन्हा फुटेजची बारकाईने पाहणी केली असता चोरी करणारा व्यक्ती ऑफिसमधील असावा, असा संशय आला. त्यानुसार पथकाने ऑफिसमध्ये काम करणारे आणि काम सोडून गेलेल्या कर्मचार्‍यांची चौकशी सुरु केली. दरम्यान, चोरटा ऑफिसमधीलच असल्याचे तपासात समोर आले. पथकाने रिचर्ड डिसोजा यास रविवारी (दि.९) दुपारी २.३० वाजता राहत्या घरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही. पथकाने डिसोजा राहत असलेल्या परिसरात सापळा रचला. तो रात्री १०.३० वाजता घरी येत असल्याचा दिसताचा पथकाने त्यास ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत त्याने ऑफिसमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने त्यास अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रकांत अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर. आर. टेमगर, पोलीस नाईक भाऊराव गांगुर्डे, पोलीस नाईक ढमाले, पोलीस अंंमलदार शिवाजी मुंजाळ, पोलीस शिपाई उगले, पोलीस शिपाई शेवरे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -