घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये नोकरी गमावलेल्या अभियंत्याची आत्महत्या

नाशिकमध्ये नोकरी गमावलेल्या अभियंत्याची आत्महत्या

Subscribe

शवविच्छेदनानंतर पंचवटी पोलीसांचा तपास सुरू

नाशिक : कोरोनामुळे नोकरी गमावल्याने तणावात असलेल्या अभियंत्याने अहिल्याबाई होळकर पुलावरून उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवार दिनांक २८ रोजी समोर आली. मिलिंद भास्कर मराठे (वय ५७, रा. पारिजात नगर, कॉलेेज रोड, नाशिक) असे मृत अभियंत्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठे हे एका कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होते. कोरोना संकटामुळे त्यांना नोकरी गमवावी लागली होती. हाताला काम नसल्याने घर चालवायचे कसे, आर्थिक संकटातून बाहेर कसे पडावे, या विवंचनेत ते असायचे. त्यातूनच त्यांनी रविवारी सकाळी सुंदर नारायण मंदिरालगत अहिल्याबाई होळकर पुलावरून उडी घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नेमाणे, पोलीस नाईक पाटील व चव्हाण यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -