घरमहाराष्ट्रनाशिक‘सुपर ५०’ साठी २१७० विद्यार्थ्यांची परीक्षा

‘सुपर ५०’ साठी २१७० विद्यार्थ्यांची परीक्षा

Subscribe

नाशिक : विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत मोफत शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी ‘सुपर 50’ उपक्रमाअंतर्गत रविवारी (दि.13) जिल्ह्यातील 15 तालुका केंद्रावर घेण्यात आलेल्या चाचणी परीक्षेत 2 हजार 170 (67 टक्के) विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील पहिल्या 50 विद्यार्थ्यांची निवड होणार आहे.

ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील इयत्ता 11 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर 50’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी शनिवारी (दि.13) जिल्ह्यातील 15 तालुका केंद्रावर चाचणी परीक्षा घेण्यात आली. यात अर्ज भरलेल्यापैकी 67 टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. शुक्रवारपर्यंत 2 हजार 988 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. शनिवारी ऐनवेळी 241 विद्यार्थी यात समाविष्ट झाले. त्यामुळे एकूण 3 हजार 229 विद्यार्थ्यांनी नोंद केली. मात्र, त्यापैकी 2 हजार 170 विद्यार्थीच उपस्थित होते तर 1 हजार 59 विद्यार्थ्यांनी या चाचणी परिक्षेकडे पाठ फिरवली. या उपक्रमामध्ये अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील सन 2022-23 मध्ये इयत्ता 11 वी विज्ञान शाखेतील अनुदानित, अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळेतील प्रवेशीत विद्यार्थ्यांकरीता निवासी स्वरुपात नियमित अभ्यासक्रमाबरोबर सीईटी, जेईई या पात्रता परीक्षेकरीता 50 विद्यार्थ्यांची परीक्षेद्वारे निवड करण्यात येऊन या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यातुन यासाठी पात्रता परीक्षा घेण्यात येणार आली. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात आली होती. आता निकालाची प्रतीक्षा लागून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -