घरमहाराष्ट्रनाशिकवर्गणीची जबरदस्ती केल्यास खंडणीचा गुन्हा

वर्गणीची जबरदस्ती केल्यास खंडणीचा गुन्हा

Subscribe

पोलीस आयुक्तांच्या सार्वजनिक गणेश मंडळांना मार्गदर्शक सूचना

गणरायाचे आगमण अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपले असताना गणेशोत्सव मंडळाची वर्गणी संकलनासाठी लगबग सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे गणेश मंडळे व्यापार्‍यांकडून, राजकीय पक्षांची नेतेमंडळी, रहिवाशी, बिल्डर व समाजसेवकांकडून वर्गणी गोळा करतात. वर्गणी संकलनासाठी जबरदस्ती करणार्‍या गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. वर्गणी गोळा करताना कोणालाही दमदाटी, मारहाण, शिवीगाळ करत अव्वाच्या सव्वा रक्कम मागणी केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात आल्यास मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमंडळांना शहर पोलिसांकडून चांगल्या प्रकारचे सहकार्य राहणार आहे. महापालिका आणि शहर पोलीस एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मंडळांना परवानगी दिली जात आहे. सर्व मंडळांची पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे. रस्त्यावर मंडप घालताना महापालिकेची परवानगी घेणेही आवश्यक आहे. गणेशोत्सव काळात सर्व मंडळानी आवाजाची मर्यादा पाळायची आहे. आवाज मर्यादेचा भंग केल्यास पोलीस कारवाई केली जाणार आहे.

- Advertisement -

गणेशोत्सवात वाहतूक नियोजनासाठी पोलिसांकडून शहरातील गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी बैठकांचे आयोजन केले जात आहे. गतवर्षी शहरात एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. गर्दीच्या ठिकाणी जलद गतीने रुग्णवाहिका व अग्नीशमन वाहनांना जाता यावे, यासाठी गणेशमंडळांना पोलिसांकडून सूचना दिल्या जाणार आहेत. कुठल्याही मंडळाने जबरदस्ती वर्गणी गोळा केल्याच्या तक्रारी आल्या, तर त्यांच्याविरोधात खंडणीचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. मंडळानी दमदाटी व शिवीगाळ करत जोरजबरदस्तीने वर्गणी गोळा करू नका.

धार्मिक विद्वेष नको

गणेशोत्सव जवळ आल्याने गणेश उत्सव मंडळांकडून देखावे, मंडप उभारणीच्या कामास सुरुवात झाली आहे. गणेशमंडळांनी धार्मिक व जातीय विद्वेष वाढवणारे देखावे करू नयेत. जबरदस्तीने कोणाकडेही वर्गणी मागू नये. जबरदस्तीने वर्गणी मागणार्‍यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. – विश्वास नांगरे-पाटील पोलीस आयुक्त

  • पोलीस आयुक्तांच्या मंडळांना सूचना
  • जबरदस्तीने वर्गणी मागू नये.
  • स्वयंसेवकांची नेमणूक करावी.
  • वाहतूक नियोजन करावे.
  • परिसरात सीसीटीव्ही बसवावेत.
  • डॉल्बी किंवा मोठ्या प्रकारचे साउंड सिस्टीम लावू नयेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -