घरमहाराष्ट्रनाशिकबनावट मुद्रांक : गोटू वाघचा परवाना कायमस्वरुपी रद्द

बनावट मुद्रांक : गोटू वाघचा परवाना कायमस्वरुपी रद्द

Subscribe

मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी केली कारवाई

बनावट मुद्रांक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार फरार आरोपी चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ याचा परवाना मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी कायमस्वरुपी रद्द केला आहे. यापूर्वीच येथील दोन अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

मुद्रांक क्रमांक ९/२००२ महाराष्ट्र मुद्रांक पुरवठा आणि विक्री नियम १९३४ चे नियम १० व १९ प्रमाणे या प्रकरणात देवळा पोलीस ठाण्यात बनावट दस्तऐवजबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन दुय्यय निबंधक गांगोडे यांनी निलंबित परवाना धारक व मुद्रांक विक्रेता चंद्रकांत देवाजी वाघ यांचा परवाना कार्यालयाने 13 फेब्रुवारी पासून संदर्भ क्रमांक ३ च्या आदेशाने निलंबित केलेले आहे. वाघ याच्या बेकायदेशीर कृतीमुळे नोंदणी व मुद्रांक विभागाची प्रतिमा मलिन झाली. तसेच वाघ यांचा परवाना रद्द न केल्यास ते भविष्यात पत्रव्यवहार व इतर कारणानें पुन्हा दुय्यय निबंधक कार्यालयात देवळा येथे व अभिलेख कक्ष देवळा येथे प्रवेश करण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे त्यांचा मुद्रांक विक्री परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -