घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची नावे पोहोचणार थेट मंगळावर

नाशिकच्या जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची नावे पोहोचणार थेट मंगळावर

Subscribe

नासाने उपलब्ध करून दिली संधी

तालुक्यातील खामखेडा येथील फांगदर वस्ती शाळा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असल्याने चर्चेत असते. आता पुन्हा या शाळेची सर्वत्र चर्चा होत आहे. कारणही तितकेच दमदार आहे. या वस्तीशाळेतील विद्यार्थ्यांची नावे थेट नासाच्या माध्यमातून मंगळावर लिहिली जाणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील वस्तीशाळा चर्चेत आली आहे.

‘नासा’ संस्थेचे ‘मंगळ रोव्हर २०२०’ हे अंतरिक्षयान ‘लाला ग्रह’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंगळावर झेपावणार आहे. या अंतरिक्ष यानाबरोबर स्टेनसील्ड चिपवर आपली नावे पाठवून दुसर्‍या ग्रहावर आपल्या पाऊलखुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाच्यावतीने जगभरातील सामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे. ही मोहीम नासाच्या वतीने चंद्र मोहीम ते मंगळ मोहीमेच्या प्रवासापर्यंतच्या मिशनला उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहीम अंतर्गत राबवत आहेत. या अंतर्गत फांगदरच्या शाळेचे मुख्याध्यापक संजय गुंजाळ, शिक्षक खंडू मोरे यांनी शाळेतील पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक व शाळेचेही नावे या उपक्रमसाठी नोंदवले होते. त्यांचे ऑनलाईन बोर्डिंग पास नुकतेच प्राप्त झाले आहे. बोर्डिंग पासचे वाटप शाळेत व्यवस्थापन समिती अध्यक्ष बबन मोरे, दिपक मोरे, सागर पवार, सोनजी पवार, हरी माळी, राजेंद्र गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisement -

एका चिपवर दहा लाख नावे

नासाच्या पसाडेना, कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुलशन लॅबोरेटरीतल्या (गझड) मायक्रोडिव्हायसेस लॅबोरेटरीमध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या (75 नॅनोमिटर) रुंदीत नोंदवलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत. इतक्या छोट्या आकारात एक डेमी आकाराच्या चिपवर दहा लाख नावे मावतील. या चिप रोव्हरवर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवल्या जाणार आहेत.

000000000

- Advertisement -

उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नासा ही अवकाश संशोधन क्षेत्रात काम करणारी संस्था, मंगळग्रह त्या ग्रहावरची नासाची चालू असलेली मोहीम आणि पाठवले जाणारे रोव्हर २०२० हे अवकाशयान यांची माहिती मिळेल.

-सुनिता धनगर, गटशिक्षण अधिकारी, देवळा.

 

विद्यार्थ्यांच्या मनात अवकाश संशोधनाप्रती जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना या नव्या क्षेत्राची प्राथमिक माहिती व्हावी, तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील या चिमुकल्यानी नावे मंगळावर पाठवण्याची संधी मिळाल्याने आनंद होत आहे.

– संजय गुंजाळ , मुख्याध्यापक, फांगदर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -