घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशकात द्विगुणित उत्साहात गणरायाला निरोप

नाशकात द्विगुणित उत्साहात गणरायाला निरोप

Subscribe

नाशिक : कोरोनाच्या निर्बंधामुळे दोन वर्ष गणेशोत्सवाचा मनमुराद आनंद लुटता न आल्याने यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असताना गणेशभक्त, गणेश मंडळ यांनी सगळी कसर भरून काढल्याच दृश्य संपूर्ण नाशिक शहरात शुक्रवारी (दी.९) दिसून आले. शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावर गणणेशभक्तांचा अलोट जनसागर लोटला होता. तब्बल २४ मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदवला.  त्याच सोबत शहरातील उपनगरे जसे सिडको, सातपूर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, आदि भागातही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकांची धूम बघायला मिळाली.

शहरातून निघणारी मुख्य मिरवणूक यंदा सकाळी ११:३० वाजता मार्गस्थ झाली. नाशकात सर्वात पहिल्या गणपतीचा मान  नाशिक महानगरपालिकेच्या गणपतीला असतो. त्यानानंतर क्रमाने पुढील मानाचे गणपती त्यानंतर मंडळांच्या गणपतीचे मार्गक्रमण होत असते. मागील काही वर्षात अनेक मंडळांची मिरवणूक धीम्या गतीने पुढे सरकते, छोट्या मंडळांना पुढे सरकण्याची संधी मिळत नाही अशी ओरड होती. मात्र यंदा मिरवणूक लवकर सुरू झाल्यामुळे सर्वच मंडळांना मुख्य मिरवणूक मार्गावरून मार्गक्रमण पूर्ण करता आले.

- Advertisement -

डिजे बंदच

इतर शहरात जरी धुमधडाक्यात डिजे वाजत असले तरी नाशकात मात्र डिजेला परवानगी मिळाली देण्यास नाशिक शहर पोलिस आयुक्तांनी नकार दिला होता. त्यामुळे मिरवणुकीत पारंपरिक ढोल पथक, बँजो, संभळ आदीच्या तालावर गणेशभक्तांनी ठेका धरल्याच दिसून आल.

मोठा पोलिस बंदोबस्त 

यंदाच्या मिरवणुकीत २५००  हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात असल्याने मिरवणुकीला कुठेही गालबोट लागले नाही. पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फौजफाटा मिरवणुक मार्गावर तैनात होता. साध्या वेशातही अनेक पोलिस, स्वयंसेवक परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. पोलिस प्रशासनाची सतर्कता आणि  मंडळ, गणेशभक्त यांच्या सहकार्यामुळे किरकोळ अपवाद सोडले तर संपूर्ण शहरात गणेशोत्सव, विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.

- Advertisement -

मूर्तीसंकलनालाही चांगला प्रतिसाद

यंदा मनपाकडून गणेश विसर्जनाकरिता शहरात 71 ठिकाणे निश्चित झाली आहेत. शहरातील ६ विभागातील सर्वच ७१ गणपती विसर्जन ठिकाणी मूर्ती संकलन केंद्राची उभारणी करण्यात आली होती. या केंद्राच्या माध्यमातून एकूण १ लाख ७७ हजार ४०३ मूर्तीचे संकलन करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -