Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

रात्रीच्या सुमारास आपल्या शेतातील घरात गळफस घेत आत्महत्या

Related Story

- Advertisement -

इगतपुरी  मागील काही वर्षात शेतात सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने मोडाळे येथील शेतकर्‍याने गुरुवारी (दि. २) रोजी रात्री आपल्या शेतातील घरात गळफस घेत आत्महत्या केली. सुभाष दामू गोवर्धने (वय ५५) असे मृत शेतकर्‍याचे नाव असून, याप्रकरणी वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुभाष गोवर्धने यांची मोडाळे येथे पाच एकर शेती असून त्यांनी शेतीवर सोसायटी तसेच इतर ठिकाणांहून शेतीच्या भांडवलासाठी हात उसनवार, फायनान्स यांचे मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. यावेळी त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना फायनान्स कंपनीकडून वारंवार फोन येत होते. त्यामुळे ते सतत विवंचनेत असत. गुरुवारी सकाळी ते शेतात गेले आणि तेथेच शेतीत असलेल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्याच दरम्यान वडिलांना शेतीकामात मदतीसाठी गेलेल्या त्यांच्या मुलाने हा प्रकार पाहिला. याबाबत वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोवर्धने यांच्या पश्चात, दोन मुले, मुलगी, सुना, नातू असा परिवार आहे.

- Advertisement -