घरमहाराष्ट्रनाशिककांद्याच्या दराचे वांदे झाल्याने शेतकरी आक्रमक

कांद्याच्या दराचे वांदे झाल्याने शेतकरी आक्रमक

Subscribe

संतप्त कांदा उत्पादक शेतकर्यांकडून देवळा बाजार समितीसमोर रास्तारोको आंदोलन

देवळा : कांदाचे दर दररोज होणार्या घसरणीकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गुरुवारी (दि.१९) रोजी संतप्त कांदा उत्पादक शेतकर्यांकडून देवळा बाजार समितीसमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दिवसेंदिवस कांदा भावात होत असलेल्या घसरणीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकर्यांना उत्पादन खर्चही निघणे देखील मुश्किल झाले असून याकडे केंद्र शासनाचे पुर्णतः दुर्लक्ष असून गोरगरीब, कष्टकरी शेतकर्यांना न्याय मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, कांदा उत्पादक संघटना व शेतकर्यांनी देवळा – कळवण रस्त्यावर देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी राज्य व केंद्र सरकारकडून शेतकर्यांबाबत नेहमीच चुकीचे धोरण अवलंबिले जात असल्याने दिवसेंदिवस शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत आहेत .महागडी कांदा बियाणे, वीज भारनियमन, निसर्गाचा लहरीपणा,वाढती मजूरी ह्या सर्व संकटांवर मात करत व महागड्या औषधांची फवारणी करत शेतकर्यांनी कसेबसे कांद्याचे उत्पादन केले त्यातच उत्पन्नात किमान चाळीस टक्के घट आली आहे. असे असतांनाच नाफेडची खरेदी सुरू असतांना देखील कांद्याच्या दरात दिवसेंदिवस होत असलेली घसरण थांबतच नसल्याने तसेच कांद्याला किमान अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा,तसेच येथून मागे विकलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी संतप्त झालेल्या संघटना व शेतकरी यांनी हे रास्तारोको आंदोलन केले. यानंतर तहसीलदार विजय सूर्यवंशी व पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, युवा तालुकाध्यक्ष तुषार शिरसाठ, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, गोविंद पगार, संपर्क प्रमुख कुबेर जाधव, स्वाभिमानाचे जिल्हाउपाध्यक्ष रवि शेवाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मालेगाव तालुकाध्यक्ष संजय जाधव, शरद शिलावट, धना शिरसाठ, बापू बोरसे, सतीश बोरसे, विष्णू जाधव, संजय दहिवडकर, किरण मोरे, कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, शिवाजी पवार, केदा पगार, पंकज बोरसे, समाधान गुंजाळ, अनिता देसले, ललिता आहेर, नानाजी आहेर, अर्जुन देवरे, पंकज सूर्यवंशी, दशरथ पुरकर आदींसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -