घरमहाराष्ट्रनाशिकअवकाळीचा निधी प्राप्त होवूनही शेतकरी मदतीविनाच

अवकाळीचा निधी प्राप्त होवूनही शेतकरी मदतीविनाच

Subscribe

याद्यांचा घोळ सुरूच; प्रत्यक्ष मदत मिळण्यास तीन ते चार दिवस प्रतिक्षा

नाशिक जिल्हयात अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने दिलासा देण्यासाठी सरकारने जिल्हाप्रशासनाला १८१ कोटी रूपयांची मदत दिली असली तरी, आठवडा उलटूनही अद्याप शेतकर्‍यांच्या खात्यावर ही मदत जमा होऊ शकली नाही. मदत निधी देण्यासाठी शासनाच्या निकषानूसार शेतकर्‍यांची यादी तयार करण्याचे काम कृषी आणि महसूल यंत्रणेकडून सुरू असल्याने ते पुर्ण झाल्यानंतरच ही मदत शेतकर्‍यांना मिळू शकणार असल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली.

हेही वाचा – नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम मिळावी; शिवसैनिक आक्रमक

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत अवकाळी पावसाने जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांचे ६ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले. यात मका, सोयाबीन, द्राक्षे, डाळिंब, कांदा, कापूस, बाजरीसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. मालेगाव, नांदगाव, चांदवड, सिन्नर, बागलाण, निफाड, या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याच्या नुकसान भरपाईसाठी ५९९ कोटी रुपयांची मागणीही जिल्हा प्रशासनाने सरकारकडे सादर केली. तर सरकारने संपूर्ण राज्यासाठी मदतीची घोषणा केली. त्यात लाभार्थी निवडीचे निकषही जाहीर केले. त्यानुसार प्रति हेक्टरी बारमाही बागायत पिकांना १८ हजार तर खरीप पिकांना ८ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

नुकसानग्रस्त क्षेत्रानुसार मदत मिळणार

जिल्ह्यासाठी पहील्या टप्प्यात १८१ कोटी ५० लाख ८४ हजार रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनानेही तहसीलदार स्तरावर ही मदत वितरित केली आहे. मात्र, २ हेक्टरपर्यंतचे क्षेत्र आणि ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची यादी तयार करण्यात येते आहे. दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांना त्यांच्या नुकसानग्रस्त क्षेत्राच्या प्रमाणानुसार मदत दिली जाणार आहे. त्यानूसार लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येत असून पुढील तीन ते चार दिवसांत ही यादी तयार करण्यात येवून प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -