घरमहाराष्ट्रनाशिककंधाणे येथील शेतकर्‍याची कांद्याच्या ढिगावरच विष घेऊन आत्महत्या

कंधाणे येथील शेतकर्‍याची कांद्याच्या ढिगावरच विष घेऊन आत्महत्या

Subscribe

मालेेगाव तालुक्यातील ज्ञानेश्वर दत्तात्रय शिवणकर (वय ३५) या तरुण कांदा उत्पादकाने शुक्रवारी (दि.१८) शेतातील कांद्याच्या ढिगावरच विष पिवून आत्महत्या केली.

ज्ञानेश्वर शिवणकर यांनी ७५ हजार रुपये कर्ज सोसायटीकडून घेतलेले होते. उन्हाळ व लाल कांद्याची शेती तोट्यात गेल्याने ज्ञानेश्वर यांना निराशेने घेरले होते. नुकसान झालेल्या कांद्यासाठी शासनाने क्विंटलला २०० रुपये अनुदान जाहीर केले. मात्र त्याच काळात ज्ञानेश्वर यांचा अत्यल्प कांदा बाजारात विकला गेला होता. सततच्या तोट्यामुळे नैराश्यात आलेल्या ज्ञानेश्वर यांनी शुक्रवारी (दि.१८) आपल्या शेतात रचलेल्या कांद्याच्या ढिगावर बसून विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांचे पश्चात आई, वडील, २ मुले, २ मुली, २ भाऊ असा परिवार आहे.

दहा महिने चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने तो चाळीतच सडत असतांना किमान लाल कांद्याला तरी चांगला दर मिळेल या आशेने या टँकरचे पाणी घालून लागवड केली होती. परंतू लाल कांदा शेतातून काढून दीड महिना उलटला तरी शेतकर्‍याने कांदा शेतातच शिग करुन रचून ठेवला होता. हा कांदा नाशवंत असल्याने त्यालाही कोंब फुटू लागले होते. या स्थितीत निराश झालेल्या शेतकर्‍याने कर्ज डोक्यावर असतांना आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -