नाशिकरोड कारागृहात १० ते १२ कैद्यांकडून पोलिस कर्मचार्‍यावर जीवघेणा हल्ला

नाशिक : नाशिकरोड कारागृहात कैद्यांमध्ये मारामारीच्या घटना सतत घडतच असतात. मात्र आता कैद्यांनी थेट पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं आहे. दहा ते बारा कैद्यांनी एकत्र येत प्रभूचरण पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केलायं. पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिकरोड कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
महिन्याभरापूर्वीच या कैद्यांना पुण्याच्या येरवडा कारागृहातून नाशिकरोड कारागृहात आणण्यात आले आहे.