ट्रक बाजूला घेण्यास सांगितल्याने बापलेकाला मारहाण

प्रशांत नगर, पाथर्डी फाटा येथील घटना

वीटांचे नुकसान टाळण्यासाठी ट्रक बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणातून दोघांनी बापलेकांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना प्रशांत नगर, पाथर्डी फाटा येथे घडली. याप्रकरणी रोहिदास निर्मल यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रशांत नगर, पाथर्डी फाटा, नाशिक येथील कृष्णा रमेश भांगिरे (वय २५), सुनिता भांगिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित दोघांनी त्यांचा ट्रक (एमएच ०४-एचवाय ७९२१) निर्मल यांनी ठेवलेल्या वीटांजवळ पार्क केला. निर्मल यांनी वीटांचे नुकसान टाळण्यासाठी ट्रक बाजूला घेण्यास सांगितले. राग अनावर झाल्याने कृष्णा भांगिरे यांनी ट्रक बाजूला घेण्यास नकार दिला. कुरापत काढत दोघांनी बापलेकांना शिवीगाळ व मारहाण केली. पुढील तपास पोलीस हवालदार