घरमहाराष्ट्रनाशिकमुलाच्या 'त्या' कृत्याच्या नैराश्यग्रस्त बापानी केली आत्महत्या

मुलाच्या ‘त्या’ कृत्याच्या नैराश्यग्रस्त बापानी केली आत्महत्या

Subscribe

कॉंग्रेस नगरसेविकेच्या घरातून सोन्याची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या वडिलांनी विष पिऊन आत्महत्या केल्यााची घटना समोर आली आहे.

कॉंग्रेस नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्या घरात अनेक वर्षांपासून नोकरी करणाऱ्या नोकराच्या मुलानेच सोन्याची बिस्किटे चोरी केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नैराश्यात गेलेल्या पित्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मागील काही दिवसापूर्वीच नाशिक पोलिसांनी या आरोपीला चोरीच्या गुन्ह्या अंतर्गत अटक केली होती. या घटनेमुळे त्यांना नैराश्य आले असल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले आहे. श्रीपद म्हस्के (५२) असे त्यांचे नाव होते. म्हस्के हे डॉ. पाटील यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीला होते. टिळकवाडी येथील त्यांच्या दौलत या बंगल्यावर श्रीपत म्हस्के नोकरी करत असताना त्यांचा लहान मुलगाही तिथे मोलमजुरीचे काम करत असायचा. अचानक १५ जानेवारीपासून तो परभणी येथील गावी निघून गेला होता. त्यानंतर महिना झाला तरी परतला नव्हता.

घरातून सोने चोरी झाल्यामुळे गुन्हा दाखल

दरम्यान, घरातून दहा हजार रुपयांची रक्कम आणि १५ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे बिस्किटे चोरीला गेल्याची बाब डॉ. पाटील यांचे पती निनाद पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी लागलीच सरकारवाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली होती. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी परभणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मुलगा सोन्याची बिस्किटे विक्री करताना पोलिसांना मिळून आला होता. त्याने ही बिस्किटे नाशिक येथून आणल्याचे समोर आले होते. मुलाने केलेल्या चोरीचा उलगडा झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या वडिलांनी नाशिकरोड परिसरातील भगूर बसस्थानकानजिक विषारी औषध सेवन करून जीवन संपवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -